शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या बंगाल बंददरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 04:53 IST

भाजपने पुकारलेल्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान काही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळीसह हिंसाचाराच्या घटना घडल्या. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चकमकीत दोन विद्यार्थी ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने बंदची हाक दिली होती.

कोलकाता  - भाजपने पुकारलेल्या बारा तासांच्या पश्चिम बंगाल बंददरम्यान काही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळीसह हिंसाचाराच्या घटना घडल्या. उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चकमकीत दोन विद्यार्थी ठार झाल्याच्या निषेधार्थ भाजपने बंदची हाक दिली होती. बंद यशस्वी झाल्याचा दावा करीत भाजपने दोन तासआधीच तो मागे घेतला.भाजपच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे रस्त्यावर ठाण मांडून वाहतूक रोखली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करीत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. भाजपच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बंदसमर्थकांनी उत्तर दिनाजपूरमधील राष्टÑीय महामार्ग बंद केल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत लाठीमार केला.पश्चिम मिदनापोर, प. बर्धवान, दक्षिण आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात भाजप आणि तृणमूल समर्थकांत चकमक झाली. मिदनापोर जिल्ह्यात बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली, तसेच वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यांवर टायर्स जाळण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. कोलकात्यात भाजप नेत्यांनी मोर्चा काढला, तर तृणमूल काँग्रेसचे नेते आणि मंत्रीही जनजीवन सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.मध्य कोलकात्यात पोलिसांशी झटापट करण्याऱ्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बंद समर्थक हातीबगान भागात दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगत होते. पूर्व आणि दक्षिण-पूर्व रेल्वे विभागातील काही मार्गांवर रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. इस्लामपूर येथे राज्य परिवहन मंडळाच्या तीन बसची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)दोघांच्या हत्येमागे भाजपच -ममतादोन विद्यार्थी चकमकीत ठार झाल्याच्या घटनेमागे भाजपच आहे. या मुद्यांवरून बंद पुकारून भाजप राजकीय फायदा लाटू पाहत आहे. बंददरम्यान भाजपने अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.राज्यातील जनजीवन विस्कळीत करण्याचा भाजपचा बेत हाणून पाडल्याबद्दल त्यांनी प्रशासनाची प्रशंसाही केली. त्या इटलीच्या दौºयावर आहेत. बंद सपेशल अयशस्वी ठरल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालPolice Stationपोलीस ठाणे