शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पिता-पुत्रासह चौघांची हत्या, राज्यामध्ये अतिरेकी हल्ल्याचीही शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 05:53 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली.

इंफाळ : मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये एक व्यक्ती आणि त्याच्या मुलासह चार जणांची हत्या करण्यात आल्याने तणाव कायम आहे. गुप्तचर अहवालात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय ओइनम बामोलजाओ आणि त्यांचा ३५ वर्षीय मुलगा ओइनम मनिटोम्बा यांची गुरुवारी बिष्णुपूर जिल्ह्यात संशयित दहशतवाद्यांनी हत्या केली. गावाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या ५४ वर्षीय थियाम सोमेनचीही गुरुवारी त्याच जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी समुदायातील सशस्त्र व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. दुसरीकडे, हिंसाचाराच्या संदर्भात निदर्शने करण्यात आली. इंफाळमध्ये एक मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये लोकांनी सरकारला सुरक्षा व्यवस्था राखण्याचे आवाहन केले.

विदेशी शक्तींचा हात नाही कमांडोंवरील हल्ल्यात परकीय शक्तींचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. सीमा सुरक्षा दलाची एक तुकडी आणि लष्कराच्या दोन तुकड्यांसह अतिरिक्त तुकड्या मोरे येथे पाठवण्यात आल्या आहेत. अतिरेक्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.

लष्कराची मदतगेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये म्यानमार सीमेवर सुरक्षा दलांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे केंद्र सरकारही गंभीर झाले आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्राने लष्कराचे विशेष हेलिकॉप्टर (एएलएच ध्रुव) इंफाळला पाठवले आहे. 

कमांडो सैन्याची तैनाती हलविलीराज्य पोलिसांच्या तीन कमांडो तुकड्यांची सध्याची मोरेह शहरात तैनाती योग्य ठिकाणी नाही आणि त्यांच्यावर सहजपणे हल्ला होऊ शकतो. बुधवारी सुरक्षा दलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या तीन कमांडो तुकड्यांना म्यानमार सीमेजवळील शहराच्या इतर भागात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गुरुवारी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह यांनी सांगितले.  

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार