शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दिल्लीत पुन्हा हिंसाचार; पोलीस चौकी जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:12 IST

सीलमपूर भागात पोलिसांवर दगडफेक : सात मेट्रो स्टेशन्स केली बंद

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनास दिल्लीत मंगळवारी हिंसक वळण लागले. सीलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तब्बल दोन तासांनी तो भाग शांत झाल असला, तरी तिथे तणाव आहे. आंदोलकांनी दोन दुचाकी जाळल्या, तर पोलीस चौकी पेटवून दिली.

शांततेत मोर्चा सुरू असताना गर्दीतून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. काही आंदोलकांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. नंतर ड्रोनद्वारे पाहणी करून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले. या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली. जमावाने दोन दुचाकी पेटवून दिल्या. पोलीस चौकीही जाळली. नंतर सात मेट्रो स्थानके काही काळ बंद ठेवण्यात आली.सीलमपूर चौकात मोर्चा येताच पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. नागरिकत्व कायदा, एनआरसीचा विरोध करणारे फलक लोकांच्या हाती होते.केरळमध्ये बंदमध्येही आज हिंसाचार झाला. निदर्शकांनी अनेक बसेस जाळल्याचे वृत्त आहे.

विरोधकांचे राष्ट्रपतींना साकडेरविवारी निदर्शने करणाऱ्या जामिया मिलियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना केली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, असेही साकडे या नेत्यांनी राष्ट्रपतींना घातले आहे.

सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकारनागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून जामिया व अलीगढ मुस्लीम विद्यापीठात झालेल्या हिंसाचारप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. उच्च न्यायालयात दाद मागा, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुचविले.

टॅग्स :delhiदिल्ली