शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पुराव्यासाठी पतीने पत्नीचे कॉल रेकॉर्ड करणे गोपनीयतेचे उल्लंघन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 06:16 IST

पत्नीने पतीकडून पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कॉल रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेश दिले होते.

बिलासपूर : एखाद्याचे फोन कॉल त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे कलम २१ अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी  पतीला पत्नीचे कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर करण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश फेटाळले.

पत्नीने पतीकडून पोटगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने कॉल रेकॉर्डिंग सादर करण्याचे आदेश दिले होते.

महिलेने काय केला दावा? माझ्या परवानगीशिवाय मोबाइल कॉल रेकॉर्ड करणे हे तिच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद तिने केला. महिलेच्या वतीने वकिलाने गोपनीयतेच्या अधिकारावर दिलेल्या निर्णयांचा हवाला देत म्हटले की, घटनेच्या कलम २१ नुसार कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे चुकीचे आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाचा आदेश फेटाळण्यात यावा. 

कोर्टाने काय म्हटले? न्यायधीश राकेश मोहन पांडेय यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. कोणत्याही व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय मोबाइलवर रेकॉर्ड होणे चुकीचे असल्याचे मान्य केले. गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले.

फोनवरील संभाषण हा माणसाच्या खासगी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. गोपनीयतेच्या अधिकारात निश्चितपणे घराच्या किंवा कार्यालयातील फोनवरील संभाषण येते. फोन टॅपिंग घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन ठरते.     - राकेश मोहन पांडेय, न्यायाधीश

टॅग्स :Divorceघटस्फोट