शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आयप्पा मंदिरातील महिलाप्रवेशाचा प्रचारात उल्लेख केल्यास आचारसंहितेचा भंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:41 IST

केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा राजकारण्यांना इशारा

तिरुवनंतपुरम : शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या मुद्द्याचा निवडणूक प्रचारात उल्लेख केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरेल असा इशारा केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी टी. एन. मीना यांनी दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालावर निवडणूक प्रचारात टीकाटिप्पणी करणारा राजकीय पक्ष, पक्षनेता यांच्यावर कारवाई केली जाईल. अय्यप्पा मंदिरात महिलांना देण्यात आलेल्या प्रवेशाबाबत किंवा त्याच्यावरील निकालाबाबत केली जाणारी वक्तव्ये हा धार्मिक प्रचार समजला जाईल.केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत. निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात तिथे २३ एप्रिलला मतदान होणार आहे. अय्यपा मंदिरात महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आव्हान याचिका दाखल करण्याचा केरळ देवस्थान मंडळाचा विचार होता. मात्र कालांतराने मतपरिवर्तन होऊन या मंडळाने न्यायालयाचा निकाल मान्य केला. त्यानंतरही १० ते ५० वर्षे वयोगटातील ज्या महिला अय्यप्पा मंदिरात जाऊ इच्छित होत्या त्यांना भक्तांकडून अडविण्याचे प्रकार घडत होते. मात्र २ जानेवारी रोजी पहाटे बिंदू अम्मिनी, कनकदूर्गा या दोन महिलांनी या मंदिरात प्रवेश करून इतिहास घडविला होता.भाजपाला अप्रत्यक्ष तंबीमहिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात केरळ भाजपाने राज्यभरात सातत्याने निदर्शने केली होती. अय्यपा मंदिरातील प्रथा, परंपरांचे या निकालामुळे उल्लंघन होणार आहे असा आक्षेप भाजपाने घेतला होता. तर मंदिरात महिलांना प्रवेश देण्यास राज्यातील डाव्या पक्षांचे आघाडी सरकार अनुकूल आहे. त्यामुळे या सरकारवर देखील भाजपाने आगपाखड केली होती. त्यामुळे आचारसंहितेचा कशाकशामुळे भंग होईल हे सांगत असतानाच केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपाचे नाव न घेता त्या पक्षालाच तंबी दिली असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Keralaकेरळ