शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 21:50 IST

New Lieutenant Governor of Delhi: सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल बैजल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला आणि विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली.

सध्या विनय कुमार सक्सेना हे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत. 23 मार्च 1958 रोजी जन्मलेले विनय कुमार सक्सेना हे कानपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यांनी कॉर्पोरेट तसेच एनजीओ क्षेत्रात काम केले आहे. याशिवाय, विनय कुमार सक्सेना 1984 मध्ये राजस्थानमधील जेके ग्रुपमध्ये सामील झाले होते आणि 11 वर्षे काम केले होते.

दरम्यान, अनिल बैजल यांनी 18 मे रोजी अचानक दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. अनिल बैजल यांनी राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारण दिले होते. अनिल बैजल यांना दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून डिसेंबर 2016 मध्ये नियुक्त करण्यात आले होते. अनिल बैजल आणि केजरीवाल सरकारमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याच्या बातम्या येत होत्या. 

गेल्या वर्षी जुलैमध्येही, शेतकरी आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये वकिली करण्यासाठी दिल्ली मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या वकिलांची यादी अनिल बैजल यांनी नाकारली तेव्हा केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात मतभेद झाले होते. तसेच, अनिल बैजल आणि केजरीवाल सरकारमध्ये डोअर स्टेप डिलिव्हरीबाबत वाद झाला होता. 

अनिल बैजल यांची कारकीर्द!अनिल बैजल हे 1969 बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना त्यांची केंद्रीय गृह सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांची शहरी विकास मंत्रालयामध्ये बदली करण्यात आली. अनिल बैजल यांच्या 37 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इंडियन एअरलाईन्सचे चेअरमन, प्रसार भारतीचे सीईओ, गोव्यामध्ये डेव्हलपमेन्ट कमिशनर तसेच नेपाळला भारताकडून पाठवण्यात येणाऱ्या मदत कार्यामध्ये काऊंसेलर इनचार्ज म्हणून काम पाहिले. 

टॅग्स :delhiदिल्लीRamnath Kovindरामनाथ कोविंद