शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून या गावाने नाही साजरा केला स्वातंत्र्य दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 12:53 IST

देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

लखीमपुर खीरी, दि. 15 - देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमध्ये एका गावाने स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यापासून जवळपास 70 किलोमीटर दूर असलेल्या चौधीपूर गावात अजूनपर्यंत विकास झालेला नाही. गावात विज नाहीये तर रस्त्यांची स्थिती देखील अत्यंत वाईट आहे. अर्ध्याहून अधिक घरांमध्ये शौचालय नसल्याने गावक-यांना अजूनही उघड्यावर शौचास जावं लागतं. येथे राहणारा बहुतांश समाज हा आदिवासी आहे. त्यामुळे उपजिवेकेसाठी येथील लोक जंगलावर किंवा रोजंदारीच्या कामावर अवलंबून राहावं लागतं. येथे जवळपास 80 कुटुंब राहतात पण केवळ चार शौचालयं आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये विजेची सोय आहे, पण चौधीपूर गावात अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही, नवभारत टाइम्सने याबाबत वृत्त दिलं आहे. स्वातंत्र्य होवून 70 वर्ष झाली पण आमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. आम्ही अजूनही त्याच गरिबीत जगत आहोत. अशा स्वातंत्र्याचा काय फायदा?आम्हाला जर मुलभूत सुविधाच मिळत नाहीत तर आम्ही स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. आमच्याकडे मुलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही असं गावातील एक रहिवासी  गुलाब सिंह म्हणाले. जर कोणा अधिका-याने आम्हाला विचारलं की तुम्ही स्वातंत्र्य दिन साजरा का करत नाही तर मी त्यांना आमच्या गावात बोलवेन आणि आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय हे त्यांना दाखवेन, असं गावातील आणखी एक रहिवासी राम स्वरूप म्हणाले.  

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवस