शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

विजयन यांच्या टू टर्म पॉलिसीने ‘संधी’ साधली, मुख्यमंत्री पदाच्या मार्गातील अडथळे दूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 01:51 IST

सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्यांना सीपीआयएमने  उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीपीआयएमच्या मातब्बर पाच मंत्र्यांचे विधानसभेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.

पोपट पवार -तिरुवनंतपूरम : तरुण तुर्कांना राजकारणात संधी देण्याच्या नावाखाली केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सलग दोनवेळा निवडून आलेल्यांना विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (मार्क्सवादी) तिकीट नाकारून केरळच्या राजकारणात पहिल्यांदाच टू टर्म पॉलिसीचा मार्ग अवलंबला खरा; मात्र, विजयन यांची ही चाल मुख्यमंत्री पदाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी तर नाही ना, अशी शंका आता राजकीय जाणकारांमधून व्यक्त होऊ लागली आहे.  (Vijayan's two-term policy provided an 'opportunity', removing obstacles in the way of becoming the Chief Minister)

सलग दोनवेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्यांना सीपीआयएमने  उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सीपीआयएमच्या मातब्बर पाच मंत्र्यांचे विधानसभेचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. ए. के. बालन, पी. जयराजन, जी. सुधाकरन, सी. रवींद्रनाथ, टी. एम. थॉमस आणि विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन्‌ या दिग्गज नेत्यांना टू टर्म पॉलिसीचा फटका बसला आहे. हे पाचही मंत्री पिनराई विजयन यांचे पक्षांतर्गत स्पर्धक मानले जातात. त्यामुळे विजयन यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही नवी पॉलिसी राबवत आपल्या पक्षांतर्गत विराेधकांना राजकीय स्पर्धेतून अंडरप्ले केले असल्याची चर्चा आहे. 

सीपीआयएम हा सुरुवातीपासून बी. एस. अच्युतानंदन आणि पिनराई विजयन या दोन गटांमध्ये विभागला गेला. ज्या बड्या नेत्यांची उमेदवारी कापण्यात आली, ते सर्वच नेते अच्युतानंदन गटाचे असल्याने विजयन यांची टू टर्म पॉलिसीची खेळी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोने तस्करीच्या प्रकरणात पिनराई विजयन यांचे नाव आल्याने नेतृत्वावरून पक्षामध्येच वादाच्या ठिणग्या पडत आहेत. विधानसभा निवडणुकीत पुन्हा डाव्यांची सत्ता आली, तर सीपीआयएम नेतृत्व मुख्यमंत्री पदासाठी विजयन यांच्या नावाबाबत फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टू टर्म पाॅलिसीचा आधार घेत विजयन यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांना दूर सारत केरळची सूत्रे पुन्हा आपल्याकडेच कशी येतील, यादृष्टीने खेळलेली ही चाल असल्याचे मानले जाते.

पाच वेळा जिंकलेले विजयन रिंगणात कसे- सलग दोनवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे सीपीआयएमचे मातब्बर यंदा केरळच्या रणांगणातून बाहेर असले तरी, पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे पिनराई विजयन पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात कसे, असा प्रश्न अच्युतानंदन गटाकडून उपस्थित केला जात आहे. 

- मात्र, पिनराई विजयन हे सलगपणे दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकलेले नाहीत. त्यामुळे टू टर्म पॉलिसीचा नियम त्यांना लागू होत नसल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. 

- पुढील २०२६ मधील विधानसभा निवडणूक मात्र, टू टर्म पॉलिसीनुसार मला लढविता येणार नाही, असे विजयन सांगत असले तरी ७५ वर्षीय विजयन पुढच्या विधानसभा निवडणुकीवेळी ८० वर्षांचे होतील. त्यामुळे त्या वयात राजकारणाचा मार्ग धुंडाळतील का, हा प्रश्नच आहे.  

 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१Chief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारण