शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Rupani Resigns: मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला? लिहून आणलेलं उत्तर विजय रुपाणींनी वाचून दाखवलं, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 16:10 IST

Vijay Rupani Resigns: गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला यामागचं कारण विजय रुपाणी यांनी स्पष्ट केलं आहे.

Vijay Rupani Resigns: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी यामागचं कारण देखील स्पष्ट केलं. यासाठी ते एक पत्रकच घेऊन आले होते. लिहून आणलेली माहिती त्यांनी वाचून दाखवली. "गुजरातच्या विकास यात्रेत मला योगदान देण्याची संधी मिळाली. मला दिलेल्या जबाबदारीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो", असं विजय रुपाणी म्हणाले. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा!

राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी लिहून आणलेली नोंद वाचून दाखवली. ते म्हणाले, "भाजपानं मला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची अतिशय महत्त्वाची जबाबदारी दिली. त्याचं मी अतिशय चांगल्या पद्धतीनं पालन केलं. याकाळात मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष मार्गदर्शन मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली गुजरातनं सर्वांगीण विकास तसंच समाज कल्याणाच्या मार्गावर नवं शिखर गाठलं आहे. गुजरातच्या या विकास कार्यात मला योगदान देता आलं त्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त करतो"

गुजरातची विकास यात्रा नव्या ऊर्जेसह सुरू राहील"गुजरातची विकास यात्रा यापुढेही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात एका नव्या उत्साह आणि ऊर्जेसह पुढे सुरू राहावी असं मला वाटतं. यासाठीच मुख्यमंत्रिपदाचा मी राजीनामा दिला आहे. भाजपा हा एक संघटना आणि विचारधारांवर चालणारा असल्यामुळे कालानुरुप संघटनेत कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होत असतात अशी भाजपाची परंपरा आहे. जी जबाबदारी दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडण्याचं काम पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता करतो हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. पक्षाकडून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता पक्ष संघटनेत नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी काम करण्याची इच्छा मी व्यक्त केली आहे", असंही रुपाणी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Vijay Rupaniविजय रूपाणीGujaratगुजरातBJPभाजपा