शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

विजय मल्ल्या कायद्याला तुच्छ लेखतात, न्यायालयाने सुनावलं

By admin | Updated: November 4, 2016 14:31 IST

बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशामध्ये पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. विजय मल्ल्या यांना वारंवार समन्स पाठवूनही दुर्लक्ष केल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 'विजय मल्ल्या कायद्याला तुच्छ लेखत असून अजिबात आदर करत नाहीत, भारतात परतण्याचा त्यांचा कोणताच उद्देश नसल्याचा', निष्कर्ष न्यायालयाने यावेळी दर्शवला आहे.
 
 
'आपली भारतात परतण्याची इच्छा आहे, पण पासपोर्ट रद्द करण्यात आल्याने परत येऊ शकत नाही हा दावा अत्यंत अप्रामाणिक आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरफायदा घेणारा असल्याचं', न्यायालयाने म्हटलं आहे. 2012 मध्येही चेक बाऊन्स प्रकरणी विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. 
 
(विजय मल्ल्याच्या व्हिलाचा १९ ऑक्टोबरला होणार लिलाव)
(मल्ल्याची ६६३० कोटींची आणखी मालमत्ता जप्त!)
 
विजय मल्ल्या भारतात यायला तयार आहेत, मात्र भारत सरकारने त्यांचा पासपोर्ट रद्द केला आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत भारतात परतणे शक्य नाही असा दावा विजय मल्ल्याच्या वकिलाने पटियाला कोर्टात केला होता. मल्ल्याच्या वकिलाने कोर्टात हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने अंमलबजावणी संचालनालयाकडे उत्तर मागितले होते. त्याच प्रकरणाची सुनावणी आज पार पडली.   
 
(मल्ल्यांच्या ६,००० कोटींच्या संपत्तीवर टाच)
 
पटियाला हाउस कोर्टाने विजय माल्ल्याविरोधात दोन वेळेस समन्स जारी केला असून स्वतः हजर राहण्याचे आदेश दिले होते.
विजय मल्ल्या यांनी पासपोर्ट रद्द करण्यात आलेला असल्याने भारतात परतणं शक्य नसल्याचा केलेला दावा परराष्ट्र मंत्रालयाने खोडला आहे. विजय मल्ल्यांना खरंच भारतामध्ये परतायचं असेल तर आणीबाणी प्रमाणपत्राची (इमर्जन्सी सर्टिफिकेट) सोय उपलब्ध आहे. कोणत्याही नागरिकाला भारतामध्ये परतायचं असेल तर जवळच्या भारतीय दुतावासाशी किंवा उच्चायुक्तांशी संपर्क साधून आणीबाणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करु शकतात अशी माहिती अधिका-यांनी दिली होती. 
 
(विजय मल्ल्याविरोधात सीबीआयकडून अजून एक गुन्हा नोंद)
 
'आणीबाणी प्रमाणपत्र हे एक विशेष प्रवास दस्तऐवज असून भारतीय नागरिकाला देशामध्ये परतण्याची मुभा यातून मिळते,' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली होती. विजय मल्ल्या या सुविधेचा फायदा घेत अर्ज करणार का ? असा सवालही त्यांनी विचारला होता. 
 
मल्ल्यांचं पलायन - 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.