शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिक विवाहांमध्ये शहरी उच्चभ्रूंचा विचार, केंद्र सरकारचे मत, सादर केले प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:16 IST

Same-Sex Marriages: समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम होणार आहे. यावर संसदेने निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.

नवी दिल्ली : समलिंगी विवाह कायदेशीर करण्याची मागणी केवळ शहरी उच्चभ्रू वर्गाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हितावर परिणाम होणार आहे. यावर संसदेने निर्णय घ्यावा, असे केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. याच वेळी न्यायालयाने या निर्णयापासून दूर राहावे, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले.

केंद्राने समलिंगी विवाहावर दुसरे प्रतिज्ञापत्र सादर केले आणि त्याच्या बाजूने दाखल केलेल्या याचिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समलिंगी विवाह ही केवळ शहरी उच्चभ्रू वर्गातील लोकांची मागणी आहे. 

अशा विवाहांना सामाजिक मान्यता देणे हाच या याचिकांचा उद्देश असल्याचे सरकारने म्हटले आहे. सर्वच धर्मांत विवाहाला सामाजिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात, अगदी इस्लाममध्येही विवाह हा संस्कार मानला जातो. त्यामुळे या याचिका फेटाळण्यात याव्यात, असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटले. सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष या विषयावर वेगवेगळी मते ठेवत असल्याने या खटल्याची सुनावणी आणि निकालाचा देशभरात व्यापक परिणाम होणार आहे.

आज होणार सुनावणीn सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या केंद्राच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले. n सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या याचिकेचा संदर्भ देणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या निवेदनाची दखल घेतली. n या खंडपीठात न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांचाही समावेश आहे. या प्रकरणातील सुनावणी मंगळवारी (१८ एप्रिल) होणार आहे.

सरकारचा विरोध का?n सरकारने म्हटले होते की, न्यायालयाने आयपीसीच्या कलम ३७७ ला गुन्ह्यातून बाद केले असले तरी याचा अर्थ असा नाही की याचिकाकर्ते समलिंगी विवाहाच्या मूलभूत अधिकारावर दावा करतील.n समलिंगी विवाहाची तुलना भारतीय कुटुंबात पती-पत्नीच्या संकल्पनेशी होऊ शकत नाही. कायद्यानुसारही समलिंगी विवाहाला मान्यता देता येत नाही, कारण त्यात पती-पत्नीची व्याख्या जैविक दृष्ट्या देण्यात आली आहे. वाद झाल्यास पती-पत्नीचा वेगळा विचार कसा करता येईल?n या विवाहांना कायदेशीर मान्यता दिल्याने दत्तक घेणे, घटस्फोट, देखभाल, वारसा इत्यादी मुद्द्यांमध्ये खूप गुंतागुंत निर्माण होईल. सर्व वैधानिक तरतुदी पुरुष आणि स्त्री यांच्यातील विवाहावर आधारित आहेत.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय