शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवर 20-30 रुपयांना मुलींचे व्हिडिओ, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी फोटोंसह पुरावा सादर केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 18:12 IST

'ट्विटरवर महिलांचे अंघोळ करताना किंवा बलात्काराचे व्हिडीओ शेअर केले जात आहेत'- स्वाती मालीवाल

नवी दिल्ली: नुकताच मोहालीत विद्यापीठातील तरुणींचा एमएमएस शूट केल्याचा प्रकार समोर आला, ज्यामुळे देशभरात गोंधळ उडाला आहे. यातच आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी सोशल मीडिया आणि ट्विटरवर चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत मोठा दावा केला आहे. 'जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेले ट्विटर, लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकण्याचे माध्यम बनले आहे. ट्विटरवर लहान मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ आहेत. 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकले जातात,' असा दावा त्यांनी केला आहे.

याप्रकरणी ट्विटर इंडियाच्या प्रमुखाला समन्स पाठवण्यात आल्याचे मालीवाल यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांना दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन उत्तर देण्यासाठी बोलावले आहे. ट्विटर फक्त अमेरिकन कायद्याचे पालन करते का, असा सवाल त्यांनी केला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या डीसीपींनाही समन्स बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी आयोगानेही तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी तातडीने एफआयआर नोंदवावा. जर आमच्या समन्सला प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही अटक वॉरंटदेखील जारी करू शकतो, दिल्ली महिला आयोगाला हे करण्याचा अधिकार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

परदेशात कायद्याचे पालन, भारतात नाहीस्वाती मालीवाल यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हजारो लोक लहान मुलींवर झालेल्या बलात्काराचे व्हिडिओ शेअर करत आहेत. छुप्या कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडिओही टाकले जात आहेत. या कंपन्या परदेशातील कायद्यांचे पालन करतात आणि भारतातील महिलांवरील अश्लीलता आणि बलात्काराकडे डोळेझाक करतात. जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक, ट्विटर हे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकण्याचे माध्यम बनले आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या व्हिडिओन ट्विटर भरले आहे. 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकले जात आहेत. 

टॅग्स :Twitterट्विटरSocial Viralसोशल व्हायरल