शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

"खर्च करायचा असेल तर तिलाच कमवू द्या"; पत्नीची अवास्तव पोटगीची मागणी, कोर्टानं झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 21:34 IST

पोटगीच्या रकमेची अवास्तव मागणी करणाऱ्या महिलेला हायकोर्टाच्या महिला न्यायमूर्तीनी चांगलेच फटकारले.

Karnataka HC : सध्याच्या जगात घटस्फोटांचे प्रमाण हे वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या घटस्फोटानंतर पोटगीचा प्रकार देखील येतोच. याच कारणामुळे अनेकदा भांडणे देखील होतात हे वाद कोर्टापर्यंत जातात. अशाच एका पोटगी प्रकरणाच्या सुनावणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरणपोषणाची मागणी करणाऱ्या एका पत्नीचे विचित्र प्रकरण कर्नाटकउच्च न्यायालयात पोहोचलं होतं. सुनावणीदरम्यान यामध्ये मागणी केलेल्या रक्कम ऐकल्यानंतर योग्य मागणी घेऊन या, असे न्यायमूर्तींनी सांगितले.

व्हायरल व्हिडीओमध्ये कर्नाटकउच्च न्यायालयातील एक महिला न्यायमूर्ती  पत्नीने तिच्या पतीकडून भरणपोषणाची रक्कम मागितल्याबद्दल वकिलाला प्रश्न करताना दिसत आहेत. एका महिलेने तिच्या वकीलामार्फत आपल्याला पतीकडून मासिक देखभाल खर्चासाठी ६,१६, ३००  रुपये मिळावेत अशी मागणी केली होती. त्यानंतर महिला न्यायमूर्तींनी अवास्तव पोटगीच्या मागणीसाठी वकिलाला चांगलेच फटकारले. एवढी मोठी रक्कम ऐकून न्यायाधीशही थक्क झाल्या. एकटी महिला इतका खर्च करू शकत नाही, अशी तिखट टिप्पणी त्यांनी केली. जर महिलेला ब्रँडेड गोष्टींचा शौक असेल तर तिने त्यासाठी स्वतःच कमवावे, असे महिला न्यायमूर्तींनी सांगितले.

वकिलाचे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर महिला न्यायमूर्ती म्हणाल्या की, कोणती अशी महिला आहे जी महिन्याला ६ लाख १६ हजार रुपये खर्च करते? तुम्ही या नियमांचा फायदा तर घेत नाही ना? त्यानंतर पतीच्या वतीने हजर असलेल्या वकिलाने याला विरोध करत हा छळ असल्याचे सांगितले. कर्नाटक उच्च न्यायालयातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पत्नीच्या वकीलाने भरणपोषणाची मागणी करताना पतीने ६,१६,३०० रुपये दरमहा पोटगी द्यावी, अशी मागणी न्यायालयाच्या पुढे केली. "महिलेला गुडघेदुखीसह इतरही काही आजार होते. यासाठी फिजिओथेरपीचा खर्च महिन्याला ४-५ लाख रुपये आहे. महिलेला तिच्या शूज आणि कपड्यांसाठी दरमहा १५,००० रुपये लागतात. एवढेच नाही तर घरात खाण्यासाठी दरमहा ६० हजार रुपये खर्च होतात. याशिवाय घराबाहेरील जेवण्यासाठी काही हजार रुपये लागतात जातात. अशा परिस्थितीत, तिला पतीकडून ६,१६,३०० रुपये दरमहा देखभाल भत्ता म्हणून दिले जावे," असे वकिलाने सांगितले.

वकिलाने दिलेली मागणी आणि कागदपत्रे पाहिल्यानंतर महिला न्यायमूर्तींनी याबाबत भाष्य केलं. "तुमच्या अशिलाला नियमाचा जास्त फायदा घ्यायचा आहे असे तुम्हाला वाटत नाही का?, असा सवाल महिला न्यायमूर्तींनी विचारला. तेव्हा महिलेच्या वकिलाने सांगितले की, माझ्या अशिलाला म्हणजेच घटस्फोटित महिलेला ब्रँडेड कपडे वापरण्याची आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची सवय आहे. यावर महिला न्यायमूर्तींनी वकिलाला इशारा दिला.

"जर ती सर्व काही ब्रँडेड वापरत असेल तर ती स्वतः का कमावत नाही. इतका खर्च कोण करतो? तिच्यावर इतर कोणतीही जबाबदारी नाही. मुले नाहीत. महिलेची मागणी योग्य नाही. महिलेच्या वकिलालाही योग्य ती रक्कम मागावी अन्यथा तुमची याचिका फेटाळण्यात येईल," असे महिला न्यायमूर्तींनी म्हटलं.

टॅग्स :Karnatakकर्नाटकHigh Courtउच्च न्यायालयSocial Viralसोशल व्हायरल