शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! ऑफिसमध्ये हेल्मेट घालून काम करतात सरकारी कर्मचारी, कारण ऐकताच बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 12:58 IST

कर्मचारी हेल्मेट घालून दररोजचं काम करताना दिसतात. यामागचं एक धक्कादायक कारण समोर आलं आहे.

तेलंगणामध्ये एक अनोखं दृश्य पाहायला मिळालं आहे. येथील कर्मचारी हेल्मेट घालून दररोजचं काम करताना दिसतात. यामागचं एक धक्कादायक कारण समोर आलं आहे. एमपीडीओ कार्यालयाच्या छताची दुरवस्था आणि या धोकादायक स्थितीमुळे कामाच्या वेळी अपघात होऊ नये म्हणून कर्मचारी हेल्मेट घालत असल्याचं आता समोर आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील बीरपूर मंडलमध्ये अजब प्रकार पाहायला मिळत आहे. तेथील कर्मचारी हेल्मेट घालून दैनंदिन काम करताना दिसले. एमपीडीओ कार्यालयाच्या छताची दुरवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांवर काम करताना हेल्मेट घालण्याची वेळ आली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 

कर्मचार्‍यांनी सांगितले की, छतावरून प्लास्टर पडत असल्याने त्यांनी आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका कमी करण्यासाठी त्यांनी हेल्मेट घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांनी इमारतीच्या दुरवस्थेची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा त्यांचा दावा आहे.

या प्रकरणाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये इमारतीची जीर्ण अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. कर्मचार्‍यांना काम करण्यासाठी सुरक्षित जागा न दिल्याबद्दल नेटिझन्स अधिकाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Telanganaतेलंगणा