शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

Video: अयोध्येत सचिन अन् रजनीकांत शेजारी; PM मोदी आले अन् नमस्कार करुन गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 11:43 IST

बिग बी अमिताभ बच्चनपासून ते मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज रामनाम जपताना दिसून आले.  

रामभक्तांच्या ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य-दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. २२ जानेवारी रोजी हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजली, देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. आज आपले राम आले आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येतील या सोहळ्याला  लाखो भाविक अन् देशातील बड्या हस्तींनी उपस्थिती दर्शवली. त्यामध्ये, बिग बी अमिताभ बच्चनपासून ते मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेक दिग्गज रामनाम जपताना दिसून आले.  

"२२ जानेवारी २०२४ चा हा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे... कॅलेंडरवर लिहिलेली ही तारीख नाही, तर नव्या काळचक्राचा उदय आहे.", असे मोदींनी आपल्या भाषणात म्हटले. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत" असंही मोदी म्हणाले. आपल्या भाषणानंतर मोदींनी व्यासपीठावरील संतांचे दर्शन घेऊन मार्गक्रमण केले. त्यानंतर, समोर उभे असलेल्या दिग्गजांच्या, निमंत्रितांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कारही केला. 

देशभरातून प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या ७ हजार दिग्गजांना मोदींनी भेटून नमस्कार केला. ज्यांच्या भेटीसाठी दररोज रांगा लागतात, ते दिग्गजही येथे रांगेत पाहायला मिळाले. त्यामध्ये, बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, संत, महाराज आणि राजकीय नेतेही दिसून आले. बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, सुपरस्टार रजनीकांत हेही सपत्नीक हजर होते, तर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरही रामनामाचा जप करताना दिसून आले. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी आलेल्या दिग्गजांच्या बैठक व्यवस्थेत सचिन तेंडुलकर आणि रजनीकांत शेजारी शेजारी बसल्याचं पाहायला मिळालं. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात दोघेही जय श्रीराम म्हणताना दिसत आहेत. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी हेही सहकुटुंब अयोध्येत पोहोचले होते. तर, श्री श्री श्री रविशंकर, बाबा रामदेव यांच्यासह अनेक मोठमोठे संत, साधूही अयोध्या नगरीत होते. मोदींनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला. यावेळी, सचिन तेंडुलकर आणि रजनीकांत यांनाही मोदींनी हात जोडून नमस्कार केल्याचं पाहायला मिळालं. तर, बिग बी अमिताभ बच्चन यांना नमस्कार करताना मोदींनी त्यांच्या हाताला लागलेल्या जखमेबद्दल विचारपूस केली. लाखो भाविकांसह हजारोंच्या संख्येने जमलेल्या दिग्गजांच्या मुखीही एकच नारा एकही नाम... जय श्रीराम असल्याचं दिसून आलं. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याSachin Tendulkarसचिन तेंडुलकरAmitabh Bachchanअमिताभ बच्चन