शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Video : पंतप्रधान मोदींनी केली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 10:54 IST

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली आहे. मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली.सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे महाबलीपूरममध्ये स्वागत केले आले. पंतप्रधान मोदी व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची दोन दिवसांची शिखर परिषद होणार असून या परिषदेमध्ये अनौपचारिक स्वरुपाची चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी भारताकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (12 ऑक्टोबर) सकाळी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता केली आहे. मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ पोस्ट करून माहिती दिली आहे. 

पंतप्रधान मोदी महाबलीपूरमच्या समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकचा कचरा गोळा केला. जवळपास अर्धा तास मोदी यांनी समुद्र किनाऱ्यावर कचरा गोळा केला. प्लास्टिकची पाकिटं, बाटल्या आणि इतर कचरा मोदींनी गोळा करून साफसफाई केली आहे. तसेच व्हिडीओ पोस्ट करून सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

'आपण सर्वांनीच सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच आपण सर्वांनी तंदुरुस्त राहाण्याचाही प्रयत्न करायला हवा,’ असं आवाहन नागरिकांना मोदींनी केलं आहे. साफसफाईचा तीन मिनिटांचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी गोळा केलेला प्लास्टिकचा कचरा हा ते ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलचा कर्मचारी जयराज यांच्याकडे दिला. 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे शुक्रवारी दुपारी चेन्नई विमानतळावर भरतनाट्यम आणि लोकनृत्य कलाकारांनी तामिळ सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग द्विपक्षीय संबंधात संतुलन आणण्यासाठी प्रयत्नांवर चर्चा करू शकतात. या चर्चेदरम्यान कोणताही अजेंडा असणार नाही. काश्मिरातील कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात चर्चा होत आहे.

भारताकडून या परिषदेच्या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सहभागी होणार आहेत. तर चीनकडून जिनपिंग यांच्यासोबत 100 जणांचे शिष्टमंडळही आले आहे. यामध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही अनौपचारिक स्वरुपाची चर्चा असणार आहे. त्यामुळे कोणताही करार या बैठकीअंती होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTamilnaduतामिळनाडूSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानIndiaभारतchinaचीन