शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा रोमँटिक डान्स; प्रेक्षकांकडून टाळ्यांची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:17 IST

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुलाच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Shivraj Singh Chauhan Dnace Video:मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हे नेहमीच त्यांच्या दिलखुलास व्यक्तीमत्वामुळे चर्चेत असतात. अशातच आता केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा कुणाल सिंह चौहान याने  रिद्धी हिच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नसमारंभानंतर शिवराज सिंह चौहान यांनी त्यांची पत्नी साधना यांच्यासह रोमँटिक डान्स केला. त्यांच्या डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा धाकटा मुलगा कुणाल सिंह चौहान विवाहबंधनात अडकला. यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बडे नेते भोपाळला पोहोचले होते. मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह मध्य प्रदेशातील अनेक बडे नेतेही त्यांच्यासोबत सहभागी झाले होते.

कुणाल सिंह यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी भोपाळमधील नीलबाद भागातील वाना ग्रीन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्नी साधना यांच्यासह जोरदार डान्स करताना दिसत आहेत. शिवराज सिंह चौहान यांनी पत्नीसह जनम जनम का साथ है तुम्हारा हमारा या गाण्यावर डान्स केला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

याआधी कुणाल यांच्या हळदीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता ज्यामध्ये शिवराज सिंह चौहान हे डान्स करत होते. शिवराज सिंह चौहान पत्नी साधना चौहानसोबत 'मैं जट यमला पगला दीवाना' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. यावेळी शिवराज सिंह चौहान यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या लग्नाचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये शिवराज सिंह चौहान हे मंत्री म्हणून नाही तर वडील म्हणून आनंद व्यक्त करत होते.

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्या मुलाची आणि सुनेची फोटो शेअर केले आहेत. "देवाच्या कृपेने, पूर्वजांचे आशीर्वाद आणि सर्व प्रियजनांच्या शुभेच्छा, मुलगा कुणाल आणि रिद्धीचा आशीर्वाद सोहळा आज आनंदात पार पडला. रिद्धी सून नव्हे तर मुलगी म्हणून घरी येत आहे. आमच्या कुटुंबात स्वागत करताना आमचे मन अभिमानाने आणि आनंदाने भरले आहे," असं शिवराज सिंह  चौहान यांनी म्हटलं. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान