शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'अब तो होश ना खबर है....', आमदार गोपाल मंडलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल, पुन्हा चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:43 IST

Gopal Mandal : नेहा कक्कडने गायिलेल्या 'अब तो होश ना खबर है, तुझसे मिलने के बाद दिलबर' या गाण्यावर आमदार गोपाल मंडल हे डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत.

बिहारमधील जनता दल युनायटेडचे आमदार गोपाल मंडल सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. त्यांची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. यावेळी गोपाळ मंडल आपल्या विधानाने नाही, तर एका लग्न समारंभात बॉलिवूड गाण्यावर थिरकल्याने चर्चेत आले आहेत. बॉलिवूड गाण्यावर डान्स केलेला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडने गायिलेल्या 'अब तो होश ना खबर है, तुझसे मिलने के बाद दिलबर' या गाण्यावर आमदार गोपाल मंडल हे डान्स करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. सफेद कुर्ता आणि पायजामा परिधान केलेले आमदार गोपाल मंडल हे आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात उपस्थित असल्याचे व्हिडिओवरून दिसून येते.    

डान्स फ्लोअरवर मुलांसोबत थिरकलेआजकाल लग्नात डीजे लावला जातो. अशाच प्रकारे आमदार गोपाल मंडल उपस्थित असलेल्या लग्नात डीजे लावण्यात आला होता. यावेळी डीजेच्या तालावर थिरकण्याचा मोह आमदार गोपाल मंडल यांना आवरता आला नाही. त्यांनी डान्स फ्लोअरवर मुलांसोबत बॉलिवूड गाण्यावर डान्स केला.  दरम्यान, आमदार गोपाल मंडल डान्स करत असताना त्यांचा कोणीतरी व्हिडिओ तयार केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याआधीही व्हिडिओ व्हायरलगोपाल मंडल हे भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. दरम्यान, याआधीही गोपाल मंडल यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. गोपाल मंडल यांचा रेल्वेमधील हाफ पँटवर असलेला व्हिडिओ खूप चर्चेत होता. त्याआधी गोपाल मंडल यांची शिवभक्ती सुद्धा चर्चेत आली होती, ज्यावेळी कोरोना संकट काळात कावड घेऊन शिवालय पोहोचले होते आणि बंद मंदिर उघडण्यासाठी अडून बसले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलBiharबिहार