शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:09 IST

दिल्लीत झालेल्या भीषण स्फोटाचा व्हिडीओ समोर आला असून यानंतर सीसीटीव्ही देखील बंद पडले.

Delhi Blast CCTV: १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाचा 'तो' हादरवणारा क्षण पहिल्यांदाच समोर आला आहे. संशयित दहशतवादी उमर नबी याच्या गाडीत स्फोट होतानाचे सीसीटीव्ही फुटेज आता तपास यंत्रणांच्या हाती लागले आहे, ज्यामुळे या घटनेच्या तीव्रतेची कल्पना येते. सोमवार संध्याकाळी, राजधानी दिल्लीत झालेल्या या स्फोटात किमान १० लोकांचा जागीच मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

चांदणी चौकावर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये कैद झालेल्या फुटेजमध्ये स्फोटाचे भयानक दृश्य दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटे आणि ५२ सेकंदाची वेळ दिसत आहे. अंधार पडलेला असताना, लाल किल्ल्याच्या चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ गाड्यांची (कार, बाईक, ऑटो) मोठी गर्दी होती आणि वाहने हळू हळू पुढे सरकत होती. याच वेळी, संशयित दहशतवादी उमर नबी चालवत असलेल्या कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि आगीचा एक मोठा गोळा आकाशात तयार झाल. त्यानंतर सर्वत्र अंधार पसरला. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून कॅप्चर झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे स्फोटाची घटना आणि त्यानंतर झालेले नुकसान याचा अंदाज लावता येऊ शकतो.

प्राथमिक तपासात स्फोटकांनी भरलेली कार जाणीवपूर्वक वर्दळीच्या चौकात नेण्यात आली होती. तपासात असेही दिसून आले की उमरने हा स्फोट साथिदारांच्या अटकेनंतर भीतीने केला होता. जैशचा संशयित दहशतवादी उमर याच्या कारमध्ये झालेल्या या स्फोटामुळे काही क्षणातच संपूर्ण परिसर स्तब्ध झाला. या स्फोटाची अनेक वाहनांना झळ बसली. एवढेच नाही तर घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर मृतदेहांचे अवयव फेकले गेले. स्फोट इतका भीषण होता की तिथले सीसीटीव्ही देखील बंद झाले.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळील ट्रॅफिक सिग्नलवर हा स्फोट झाला, ज्यामुळे अनेक वाहने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, लाल किल्ल्याजवळ झालेला हा कार स्फोट एका मोठ्या कटाचा भाग होता. या कटाचे मॉड्यूल फरीदाबादमधून कार्यरत असलेल्या 'व्हाइट कॉलर' दहशतवादी नेटवर्ककडून केले जात होते. या नेटवर्कचे धागेदोरे जम्मू-काश्मीरमधील डॉक्टरांशी जोडलेले आहेत. या मॉड्यूलमध्ये डॉक्टर, मौलवी आणि उच्चशिक्षित व्यावसायिक लोकांचा सहभाग होता. स्फोट झालेली कार हा याच मॉड्यूलचा सूत्रधाल असलेला संशयित दहशतवादी डॉ. उमर नबी चालवत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Car Blast: CCTV Footage Reveals Horrifying Moment of Explosion

Web Summary : CCTV footage reveals the horrifying moment of the Delhi car blast near Red Fort on November 10th. The explosion, suspected to be a terrorist act, killed at least 10 and injured over 20. Investigation reveals a larger conspiracy involving a Faridabad-based network with links to J&K.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटcctvसीसीटीव्ही