शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video : माणसाच्या मातीला कुणी जाईना, घोड्याच्या अंत्यसंस्काराला हजारोंची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 13:07 IST

कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेपासून ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे.

ठळक मुद्देघोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील हजारो नागरिक उपस्थित राहिल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. आता, अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. 

बंगळुरू - कोरोनाचं संकट दूर व्हावं म्हणून कुणी होम-हवन करतंय, तर कुणी देवाला नवस बोलतंय. विज्ञानापासून ते अध्यात्मापर्यंत कोरोनामुक्तीसाठी संघर्ष आणि प्रार्थना सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकच्याबेळगावमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. मात्र, या घोड्याचाच मृत्यू झाला असून घोड्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हजारों नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. या गर्दीत कोरोनाचे नियमांचा फज्जा उडाल्याचंही दिसून आलं.   

कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेपासून ते गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांना कोरोनाचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे. कोरोना नियमा पाळण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करण्यातच काहीजण आघाडीवर असतात. कर्नाटकच्या गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावातील मरडीमठ येथे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी देवाला घोडा सोडण्यात आला होता. या घोड्याच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी गावातील हजारो नागरिक उपस्थित राहिल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. आता, अंत्यसंस्कारात सहभागी असलेल्या सर्वांची रॅपिड अँटीजेन चाचणी केली जाणार आहे. 

महास्वामींच्या मार्गदर्शनात सोडला घोडा

बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील मरडीमठात पवाडेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा घोडा सोडला होता. बुधवारी मध्यरात्री 12 ते गुरुवारी सकाळी 4 वाजेपर्यंत हा घोडा सोडण्यात आला. दैवी घोडा कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्यासाठी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुर्दैवाने या घोड्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर, अंत्यसंस्कारासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. विधिवत पद्धतीने या घोड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकbelgaonबेळगाव