शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Video - "मला खूप दुःख होईल"; नरेंद्र मोदींनी थांबवलं भाषण, लोकांना केली 'ही' विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 16:14 IST

पंतप्रधानांच्या विनंतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील निवडणूक रॅलीतील भाषण थांबवून लोकांना टॉवरवरून खाली येण्याची विनंती केली. टॉवरवर चढणाऱ्या लोकांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आणि टॉवरवरून खाली पडू शकतात असं सांगितलं. "मला माहीत आहे की तुम्ही लोक मला पाहू शकणार नाही, परंतु कोणी पडलं तर मला खूप दुःख होईल" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. रॅलीसाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. 

तेलंगणातील निर्मल येथील रॅलीत पंतप्रधानांच्या विनंतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  काही आठवड्यांपूर्वीही त्यांनी हैदराबादमधील एका निवडणूक रॅलीत आपले भाषण थांबवले होते आणि एका महिलेला टॉवरवरून खाली उतरण्यास सांगितले होते. यावेळी "जे लोक टॉवरवर चढले आहे, त्यांना मी खाली येण्याची विनंती करतो. इथे खूप गर्दी आहे. मला समजतं की तुम्ही मला पाहू शकणार नाही, पण जर कोणी पडले तर मला खूप दुःख होईल. प्लीज खाली या." 

"मला तुमच्या प्रेमाची कदर आहे, पण कृपया खाली या. तुम्हाला इजा होऊ शकते. इथे एवढी गर्दी आहे की तुम्ही मला पाहू शकणार नाही. याबद्दल मी माफी मागतो, पण माझ्या हृदयाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल याची खात्री आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. गर्दीमध्ये तिरंगा फडकवणाऱ्या एका चिमुकलीचाही त्यांनी उल्लेख केला. "आज ती भारत माता बनून आली आहे. शाब्बास" असंही म्हटलं. 

11 नोव्हेंबर रोजी, पंतप्रधानांना हैदराबादमध्ये ट़ॉवरवर असलेल्या एका तरुणीला खाली ये असं सांगण्यासाठी भाषण थांबवावं लागलं. पंतप्रधानांनी मुलीला वारंवार खाली येण्याची विनंती केली आणि विजेच्या तारांजवळ वीज पडण्याचा धोका असल्याचे सांगितले. जेव्हा ती मोदींना काही सांगण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ते म्हणाले की, "बेटा, मी तुझे ऐकतो. कृपया खाली येऊन बस. शॉर्ट सर्किट होऊ शकतं. हे बरोबर नाही. मी तुमच्यासाठी आहे आलोय."

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी