शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

Video: शानदार, जबरदस्त... देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टर्मिनलची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 11:33 AM

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाला बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवलं असून ते सत्यातही उतरत आहे. बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशात केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली असून त्यासही प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तर, दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचे कामही वेगाने होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या ट्विटर हँलडवरुन या कामाची पहिली झलक शेअर केली आहे. अहमदाबादच्या साबरमती मल्टीमॉडल ट्रांसपोर्ट हबमध्ये उभारण्यात आलेलं देशातील पहिल्या बुलेट ट्रेन टर्मिनल व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. 

मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोरवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. देशाला पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२६ मध्ये मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करत बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टची झलकच देशवासीयांना दाखवली आहे. देशाचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक वास्तुकलेचा उत्तम नमूना म्हणजे अहमदाबादमधील ''साबरमती मल्टीमॉडल ट्रांसपोर्ट हब'' हे बुलेट ट्रेनचे टर्मिनल आहे. 

दरम्यान, भारतातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. १०० किमी लांबीचा पूल पूर्ण झाला असून, २५० किमीसाठी खांब उभारण्यात आले आहेत. देशातील ही पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी अहमदाबादमध्ये या प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी बुलेट ट्रेन प्रकल्पाची झलक दर्शविणारा व्हिडिओ शेअर करत  प्रकल्पाच्या प्रगतीशी संबंधित माहितीही दिली होती. आता, त्यांनी बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं टर्मिनल उभारण्यात आल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटीझन्सकडून अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. 

दरम्यान, बुलेट ट्रेनसाठी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) दिलेल्या माहितीनुसार, बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ४० मीटर लांबीचे फुल स्पॅन बॉक्स गर्डर व सेगमेंट गर्डर जोडून १०० किमीचा मार्ग बांधण्यात आला आहे.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनrailwayरेल्वेahmedabadअहमदाबादAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव