शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांवर लष्कराचा ग्रेनेड हल्ला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 10:58 IST

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना गती देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना गती देण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र सीमेवर सतर्क असलेले भारतीय लष्कराचे जवान पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा कारवाया हाणून पाडत आहेत. दरम्यान, पाकिस्तानी घुसखोरांच्या घुसखोरीचा अजून एक व्हिडीओ समोर आला असून, 12 आणि 13 सप्टेंबरदरम्यानच्या या व्हिडीओत पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरीच प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र भारताच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करून  पाकिस्तानी बॅट कमांडो आणि दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 

या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या कमांडोंकडून घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. त्यादरम्यान, पाकिस्तानच्या सोशल सर्व्हिस ग्रुपचे कमांडो आणि दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराने ग्रेनेडने हल्ला करून घुसखोरीचा डाव उधळून लावला. 

 यापूर्वी जम्मू काश्मीरमधील केरन विभागात लष्कराने पाकिस्तानी सैन्याचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला होता. त्यावेळी लष्कराने घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या बॅटच्या चार ते पाच घुसखोरांना ठार केले होते.  दरम्यान, 2019 मध्ये सुरुवातीच्या आठ महिन्यांमध्ये लष्कराने एकूण 139 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये नियंत्रण रेषेसह जम्मू काश्मीरमधील विविध भागात लष्कराशी झालेल्या चकमकींदरम्यान ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. दरम्यान, या काळात काश्मीर खोऱ्यामध्ये विविध लष्करी कारवायांदरम्यान भारताच्या 26 जवानांना वीरमरण आले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर