शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

Video : मी स्वत:च चौकशीची मागणी करतो, कौरप्रकरणी अरविंद सावंतांची लोकसभेत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 14:56 IST

माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय.

ठळक मुद्देशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केलं नाही, कुणासाठी अपमानित शब्दाचा प्रयोगही केला नाही.

नवी दिल्ली -सचिन वाझे प्रकरण, (Sachin Vaze Case) परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धक्कादायक आरोप करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलेले पत्र (Param Bir Singh Letter) या एकूण प्रकरणांचे देशभरात पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी लोकसभेत बोलताना खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या होत्या. यानंतर मध्यंतरात शिवसेनेचे नेते खासदारअरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यावर, आता खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उत्तर दिलंय, तसेच याप्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केलीय. (shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant)

माझ्या आयुष्यातील 50 वर्षे मी सार्वजनिक क्षेत्रात घालवली आहेत, त्यातील 25 वर्षे मी संसदीय क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे, संसदीय क्षेत्राची मर्यादा, भाषेची मर्यादा याचं नेहमीच पालन करत आलोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक आपल्यासमोर उभा आहे. माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाला अपमानित केलं नाही, कुणासाठी अपमानित शब्दाचा प्रयोगही केला नाही. त्यामुळे, आता याप्रकरणी मीच चौकशीची मागणी करतोय, असे भावनिक उद्गार खासदार सावंत यांनी संसदेत बोलताना काढले.  जे पत्र अध्यक्ष महोदयांना लिहिण्यात आले, ते पत्र सोशल मीडियात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून मी देशात बदनाम झालोय. विशेष म्हणजे महिलांचा अपमान केल्यामुळे. त्यामुळे, आपण सीसीटीव्ही तपासा, त्या पत्रात लिहिलेलं बोलण्यासाठी मला तिथं थांबाव लागलं असेल ना, तेही पाहा. आपण, माझा इतिहास तपासा आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांचाही इतिहास तपासा. मी आयुष्यात कधीच कुणाला अवमानित केलं नाही, असे म्हणत सावंत यांनी पोटतिडकीनं आपली बाजू मांडली. यापूर्वीही अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. 

यापूर्वीचं अरविंद सावंत यांचं स्पष्टीकरण 

मी आजवर कधी कोणाला धमकी दिलेली नाही. महिलेला धमकावण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी शिवसैनिक आहे. माझ्याकडून असे कधीच होणार नाही, असे अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात. तेव्हा दादा, भैय्या म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. पण धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. मागच्या एक वर्षातली त्यांची लोकसभेतली भाषणे बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेनेविरोधात त्यांची बोलण्याची पद्धत, शब्द बघा. तुमच्या लक्षात येईल", असे अरविंद सावंत म्हणाले. 

माझ्यावरही आरोप केले - संजय राऊत 

नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर संजय राऊत म्हणाले की, यांना काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेने माझ्यावर सुद्धा असेच आरोप केले होते, असे सांगत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला आहे.  

टॅग्स :Arvind Sawantअरविंद सावंतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाShiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा