शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video - आयुष्याचा नेमच नाही! 'बस आज की रात है जिंदगी' गाण्यावर नाचताना अधिकाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 15:53 IST

नाचणाऱ्या, गाणाऱ्या एका अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

कधी, काय होईल हे सांगता येत नाही, आयुष्याचा नेमच नाही. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. भोपाळमध्ये नाचणाऱ्या, गाणाऱ्या एका अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर एक भयंकर व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक फेअरवेल पार्टी सुरू आहे, ज्यामध्ये सर्व अधिकारी धमाल करत नाचत आहेत.

अधिकाऱ्यांची धमाल सुरू असतानाच असं काही घडतं, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे तुम्हाला हसवतात. पण काही व्हिडीओ असे असतात की ते पाहिल्यावर काळजी वाटू लागते. आजकाल भोपाळमध्ये नाचताना आणि गाताना एका अधिकाऱ्याच्या मृत्यूचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पार्टी सुरू आहे ज्यामध्ये अनेक लोक 'बस आज की रात है जिंदगी' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. 

नाचणाऱ्या लोकांमध्ये पिवळा शर्ट आणि काळे नेहरू जॅकेट घातलेला टपाल खात्याचा एक अधिकारीही त्याच्या मित्रांसोबत नाचत असतो. पण अचानक असे काही घडते ज्याची कल्पना कोणीही केली नसेल. मस्तीत नाचणारे अधिकारी अचानक जमिनीवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला असं म्हटलं जात आहे. ज्यामुळे हे गाणे त्याच्या आयुष्यासाठी खरं ठरलं.

सुनील वीर नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्याचे नाव सुरेंद्र कुमार दीक्षित असं आहे. टपाल विभागाचे अधिकारी असून ते सहायक संचालक म्हणून काम करत होते. व्हिडिओमध्ये त्याची विनोदी शैली स्पष्टपणे दिसत आहे आणि लोकही त्याच्यापासून प्रेरित होत नाचत होते. पण बस आज की रात है जिंदगी या गाण्यावर नाचत असताना त्यांना मृत्यूने गाठलं. याआधी देखील अशा घटना घडल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल