शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: चॅम्पियन खेळाडूला खेळतानाच आला हृदयविकाराचा झटका; रिंगमध्ये हरला आयुष्याची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 19:25 IST

चंदीगडमध्ये एका चॅम्पियन खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

Shocking Video: गेल्या काही दिवसांपासून हृदयविकाराचा झटका आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही काळापूर्वी एका वयानंतर हृदयविकाराच्या घटना समोर येत होत्या. मात्र आता शाळकरी मुलांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आताच्या अनेक तरुणांना हृदयविकाराने ग्रासल्याचे समोर येत आहे. कधी वरातीत कधी जीममध्ये तर कधी वर्गातच हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मृत्यू झाल्याची अनेक उदाहरण पाहायला मिळत आहेत. असाच काहीसा प्रकार चंदीगडमध्ये पाहायला मिळाल जिथे अवघ्या २१ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने जीव गेला.

चंदीगड विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वुशू चॅम्पियनशिपदरम्यान हा सगळा प्रकार घडला. सोमवारी जयपूर येथे राहणारा मोहित शर्मा याचा स्पर्धेदरम्यान मृत्यू झाला. रिंगमध्ये लढत असताना मोहितला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली पडला आणि मग उठलाच नाही. या स्पर्धेत नाव कमावलेल्या मोहितच्या आकस्मिक मृत्यूने क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे. मोहितला रिंगमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्याला रुग्णालयात नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून त्यामध्ये मोहित रिंगमध्ये तोंडावर पडताना दिसत आहे. मोहितने कोणतीही हालचाल न केल्याने रेफ्रींनी त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उठला नाही. रेफ्रींनी तात्काळ इतर लोकांना बोलावून मोहितला उचलून रिंगच्या बाहेर नेलं. त्यानंतर त्याला मोहालीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या तपासणीत मोहितचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. मोहित तीन दिवसांपूर्वी जयपूर येथून चॅम्पियनशिप खेळण्यासाठी आला होता. मात्र त्याला मृत्यूने गाठलं.

मोहित ८५ किलो वजनी गटात खेळत होता. त्याने पहिली फेरी जिंकली होती. दुसऱ्या फेरीतही तो आघाडीवर होता. त्यानंतर रिंगमध्ये प्रवेश करताच त्याची प्रकृती खालावली आणि तो तोंडावर पडला. सामना सुरु असताना प्रतिस्पर्ध्याशी मोहितला रिंगमधून बाहेर काढले आणि दोघेही खाली पडले. यानंतर, दोघेही खेळाडू उभे राहिले आणि रिंगमध्ये परत आले. रेफ्रीने दोघांना पुन्हा लढण्यासाठी समोरासमोर येण्यास सांगितले. मग अचानक मोहित त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडे आला आणि तोंडावर पडला. यानंतर रेफरीने इतर खेळाडूंना वर बोलवलं, प्रत्येकजण मोहितला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता पण तो काहीच हालचाल करत नव्हता. यानंतर त्याला उचलून रुग्णालयात नेले.

टॅग्स :PunjabपंजाबSocial Viralसोशल व्हायरलHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्य