श्रीनगर - भारताचे जवान देशातील जनतेच्या रक्षणासाठी नेहमीच सज्ज असतात. याचाच प्रत्यय आज बारामुल्ला येथे आला. येथे नदीच्या वेगवान प्रवाहात एक मुलगी वाहून जात असल्याचे सीआरपीएफच्या जवानांनी पाहिले. त्यानंतर या जवानांनी प्रसंगावधान राखत सदर मुलीला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढत तिचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
VIDEO : सीआरपीएफच्या जवानांचे प्रसंगावधान, वाचले बुडणाऱ्या मुलीचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 15:30 IST