शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Video : दिल्लीत भाजपा कार्यकर्त्यांनी AAP च्या आमदाराचं ऑफिस फोडलं

By महेश गलांडे | Updated: December 24, 2020 16:38 IST

भाजपाचे नेते आणि गुंड दिल्ली जल बोर्डाच्या मुख्य कार्यालयावर आले होते, त्यावेळी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही भिंतीवरुन खाली काढून फाडण्यात आला

ठळक मुद्देभाजपाचे नेते आणि गुंड दिल्ली जल बोर्डाच्या मुख्य कार्यालयावर आले होते, त्यावेळी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही भिंतीवरुन खाली काढून फाडण्यात आला

नवी दिल्ली - दिल्लीतीलभाजपा आणि आम आदमी पार्टीमधीस संघर्ष टोकाला पोहोचला असून आज भाजपा कार्यकर्त्यांनी आपचे आमदार आणि दिल्लीतील जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चंढ्ढा यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. यासंदर्भात राघव चंद्रा यांनी व्हिडिओ पोस्ट करुन माहिती दिली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली असून माझ्या अनेक सहकाऱ्यांना मारहण केली आहे. त्यामुळे, अनेक सहकारी घाबरले आहेत, असं ट्विट चंद्रा यांनी केलंय. भाजपा समर्थकांना पोलीस अडविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यालयात प्रवेश केला. 

भाजपाचे नेते आणि गुंड दिल्ली जल बोर्डाच्या मुख्य कार्यालयावर आले होते, त्यावेळी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फोटोही भिंतीवरुन खाली काढून फाडण्यात आला. या घटनेनं येथील कर्मचारी आणि महिला वर्ग घाबरुन गेले आहेत. तसेच, माझ्या नावाचा उल्लेख करत, राघव चढ्ढा तुमचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समजावून सांग, शेतकऱ्यांचं लई हित बघतोय का, शेतकऱ्यांची बाजू घ्यायचा बंद करा, अन्यथा एकएक करत आम आदमी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आम्ही असाच धडा शिकवू, असे या तोडफोड केलेल्या भाजपा समर्थकांनी म्हटल्याचं आमदार चढ्ढा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.  दरम्यान, या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करुन भाजपाला आव्हान दिलंय. मी आणि माझं सरकार शेटवच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठीच लढत राहिल. यांसारख्या भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरत नाहीत. सर्वच कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की, भाजपाच्या अशा हल्ल्यांनी गोंधळून न जाता संयम ठेवा, आपण शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहा, असे केजरीवाल यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.   

टॅग्स :AAPआपMLAआमदारArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाdelhiदिल्ली