शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'करन-अर्जुन आए न आएं, पर आएगा तो मोदी ही' भाजपाचं नवं रॅप साँग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 16:16 IST

चौकीदार रॅप माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एक रॅप साँग प्रसिद्ध केलं आहे. या गाण्याचे लेखन विनय दवे यांनी केलं आहे. 

नवी दिल्ली - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण रंगू लागलेलं असताना त्यात अनेक राजकीय पक्ष हटके प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. चौकीदार रॅप माध्यमातून भारतीय जनता पार्टीने एक रॅप साँग प्रसिद्ध केलं आहे. या गाण्याचे लेखन विनय दवे यांनी केलं आहे. 

चौकीदार चोर हे या अभियानाला प्रतिउत्तर देताना मै भी चौकीदार हे अभियान भाजपाकडून छेडण्यात आलं. पंतप्रधानांपासून भाजपाच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच जण चौकीदार बनले. या गाण्याच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना चिमटा काढण्यात आला आहे. मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुला, कन्हैयाकुमार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर या गाण्यातून निशाणा साधण्यात आला आहे.  तुम्ही कितीही एकत्र आलात, पृथ्वीवर प्रलय आला, दिवस रात्र एक झाला तरी येणार तर मोदीच असा टोला विरोधकांना लगावला आहे.   

राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन नरेंद्र मोदींना टार्गेट केलं असताना पप्पू नावाने राहुल गांधी यांची खिल्ली गाण्यातून उडविण्यात आली आहे. तुम्हीही किती ओरडा, राफेलचं खोटे बाहेर काढा, तुम्ही कितीही ओरडा येणार तर मोदीच असं गाण्यात सांगण्यात आलं आहे. ममता बॅनर्जी, लालू यादव, मायावती, अखिलेश यादव यांचा उल्लेख करत तुम्ही जातीजातीत कितीही भांडणे लावा तरी मोदीच येणार असा चिमटा काढण्यात आला आहे. भारतीय टीम ट्रॉफी घेऊन येवो ना येवो, आकाश पाताळ एक झालं तरी मोदीच येणार याप्रकारे गाणं लिहिण्यात आलं आहे. 

चौकीदार चोर है ही काँग्रेसची मोहीम भाजपाच्या चांगलीच जिव्हारी लागल्याने भारतीय जनता पार्टीनेही मै भी चौकीदार ही मोहीम हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी चौकीदार या मोहीमेतंर्गत ट्विटवर नरेंद्र मोदी नावाच्या पुढे चौकीदार नरेंद्र मोदी असा उल्लेख केला. त्यानंतर केंद्रीय मंत्री, भाजपा पदाधिकारी यांच्यासोबत अनेकांना सोशल मिडीयात आपल्या नावापुढे बदल करत चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी आपली नावं बदलली. इतकचं नाही तर मै भी चौकीदार या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद कार्यक्रम हाती घेत समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मै भी चौकीदार माध्यमातून चर्चा केली.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक