शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: भ्रदकाली मातेचं सोवळं रुप; हळदीचा अभिषेक होताच मिटले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 15:58 IST

दक्षिण भारतात एका विशिष्ट महिन्यात देवींचा उत्सव असतो. त्यासाठी, देवींची महापूजा करत उपवासही धरण्यात येतो

- भारतात धार्मिक पूजा आणि विविध उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता मानणारा हा देश असल्याने येथे सर्वच जाती-धर्मांच्या नागरिकांच्या उत्सवाचे विशेष आकर्षण असते. त्यातच, देशभरात अनेक शक्तीपीठे असून आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थान, शिर्डीचे साई मंदिर, काशी-विश्वनाथ, द्वारका, अयोध्या, १२ ज्योतिर्लिंग यांसह अनेक देव-देवतांच्या पवित्र तिर्थस्थळांना विशेष महत्त्व आहे. दक्षिण भारतातही अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरं आहेत. या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

दक्षिण भारतात एका विशिष्ट महिन्यात देवींचा उत्सव असतो. त्यासाठी, देवींची महापूजा करत उपवासही धरण्यात येतो. येथील भाविक मनोभावे हा पूजापाठ करतात. येथील प्रत्येक मंदिरांचे स्वतंत्र महत्त्व आहे. सध्या, तेलंगणाच्या वरंगळ येथील भ्रद्रकाली मातेच्या मंदिरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, माता भ्रद्रकालीचा हळदीच्या जलाने अभिषेक करण्यात येतो.   

भद्रकाली मातेचा हळदीने अभिषेक करत असताना पुजारी देवीच्या मूर्तीवर हळदीचे जल वाहताना दिसत आहेत. त्यावेळी, देवीचे डोळे उघडे असल्याचे दिसते. मात्र, अभिषेकातील हळद जल वाहताना देवीचे डोळे आपोआप बंद होतात. म्हणजे ते डोळे हळदीच्या पिवळसर रंगात लपून जातात. मात्र, हा व्हिडिओ पाहताना ही जणू चमत्कारच आहे की काय, अशी भावना अनेकांच्या मनात येते. 

दरम्यान, आत्तापर्यंत हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हे कसे शक्य आहे यावर त्यांचा विश्वास बसत नाही. काही लोकांच्या मते ही मूर्ती अशा प्रकारे बांधण्यात आली आहे की, त्यावर हळद टाकताच मूर्तीचे डोळे बंद झाल्यासारखे दिसू लागतात. तर, अनेकदा काही ठिकाणच्या चमत्काराच्या दंतकथा तेथील मंदिर आणि भाविकांच्या श्रद्धेचा अविभाज्य घटक बनलेला असतो. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाSocial Viralसोशल व्हायरलwarangal-pcवारंगलTempleमंदिर