शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

Video: दोन्ही हात नसलेल्या आर्चर शीतल देवीला 'अर्जुन पुरस्कार'; टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 22:27 IST

महाराष्ट्रातील ओजस व अदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजीत अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याच्यासह एकूण २६ खेळाडूंचा गौरव या पुरस्काराने प्रदान करण्यात आला. बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी व सात्विक साईराज रँकीरेड्डी यांना यंदाचा प्रतिष्ठीत खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. तर, नागपूरचा ओजस प्रवीण देवतळे व साताऱ्याची अदिती गोपीचंद स्वामी या तिरंदाजांचाही अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. यात आणखी एका तिरंदाजपटूचा गौरव करण्यात आला ती म्हणजे पॅरा आर्चर शीतल देवी.

महाराष्ट्रातील ओजस व अदिती यांनी मागील वर्षभरात भारताला तिरंदाजीत अनेक ऐतिहासिक पदकं जिंकून दिली. तर, यंदाच्या आशियाई पॅरा स्पर्धेत हात नसतानाही जिने पायाच्या बोटांनी अचून नेम वेधला, त्या शीतल देवीचंही सर्वत्र कौतुक झालं. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन शीतल देवीच्या नेमबाजीवर स्तुतीसुमने उधळली होती. तसेच, तुला हवी ती कार भेट देणार.. अशी घोषणाही त्यांनी केली होती. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते शितलने अर्जुन पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपतींनी शीतल देवीला पुरस्कार प्रदान करताना, तो पुरस्कार स्वत:च्या हाती ठेवून तिच्यासमवेत फोटो काढला. त्यावेळी, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. 

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाची पॅरा तिरंदाज शीतल देवीने देशासाठी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत शीतल जेव्हा भारतात परतली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचे कौतुक केले. आशियाई स्पर्धेतील विजयानंतर शीतलने यावर्षी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचं ध्येय निश्चित केलं असून ती कसून सराव करत आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते

खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी - बॅडमिंटन सात्विक साईराज रँकीरेड्डी - बॅडमिंटन 

अर्जुन पुरस्कारओजस प्रवीण देवतळे - धनुर्विद्याअदिती गोपीचंद स्वामी - धनुर्विद्याश्रीशंकर - ऍथलेटिक्सपारुल चौधरी - ऍथलेटिक्समोहम्मद हुसामुद्दीन - बॉक्सरआर वैशाली - बुद्धिबळमोहम्मद शमी - क्रिकेटअनुष अग्रवाल - घोडेस्वारीदिव्यकृती सिंग - अश्वारूढ पोशाखदीक्षा डागर - गोल्फकृष्ण बहादूर पाठक - हॉकीसुशीला चानू - हॉकीपवन कुमार - कबड्डीरितू नेगी - कबड्डीनसरीन - खो-खोपिंकी - लॉन बॉल्सऐश्वर्या प्रताप सिंह तोमर - शूटिंगईशा सिंग - शूटिंगहरिंदर पाल सिंग - स्क्वॉशअहिका मुखर्जी - टेबल टेनिससुनील कुमार - कुस्तीअंतिम - कुस्तीरोशिबिना देवी - वुशूशीतल देवी - पॅरा धनुर्विद्याअजय कुमार - अंध क्रिकेटप्राची यादव – पॅरा कॅनोइंग

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूdelhiदिल्ली