शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

VIDEO : खिलाडी अक्षय कुमारने जवानांना दिल्या 'दिवाळीच्या शुभेच्छा'

By admin | Published: October 25, 2016 12:13 PM

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 25 - दिवाळीच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठवून जवानांचे मनोबल वाढवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासीयांना केल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारने जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' देणारा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 
 
या व्हिडीओद्वारे त्याने जवानांप्रती आपले प्रेम आणि आदर व्यक्त करत, उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजलीदेखील वाहिली आहे.  तसेच, पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करायचे की नाही यावर केवळ चर्चा करणा-यांनाही अक्षयने चांगलेच फटकारले आहे. 
 
सण-उत्सव आपल्या माणसांसोबत साजरे करण्याचे आनंदाचे क्षण आम्ही तुमच्यामुळे अनुभवत आहोत, असे सांगत अक्षयने जवानांचे आभार मानले आहेत. शिवाय सीमारेषेवर शत्रूंशी लढून देशाचे संरक्षण करणा-या जवानांप्रती त्याने कृतज्ञतादेखील व्यक्त केली आहे. या व्हिडीओद्वारे त्याने भारतवासीयांनाही जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी आवाहन केले आहे. अक्षय कुमारप्रमाणे अभिनेता सलमान खान आणि आमीर खाननेही जवानांना 'दिवाळीच्या शुभेच्छा' दिल्या आहेत.  
आणखी बातम्या
 
सीमेवरील तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना 'दिवाळीच्या  शुभेच्छा' पाठवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ट्विटरवर #Sandesh2Soldiers या नावाने एक हॅशटॅग बनवण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील अनेक सेलिब्रिटींसह अनेक जणांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत.