शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

Video - रामनवमीला मोठी दुर्घटना! मंदिरात विहिरीचे छत कोसळले, 25 हून अधिक जण आत पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 13:38 IST

विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने 25 हून अधिक लोक विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत काही जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातच एक विहीर आहे, ज्यावर छत होते ते कोसळले. ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी मंदिरात होम-हवन केले जात होते आणि लोक विहिरीवर बसले होते. अचानक वजन वाढल्याने विहिरीचे छत कोसळले. काही समजण्यापूर्वीच लोक खाली पडले. पडलेल्यांमध्ये काही मुलींचाही समावेश आहे. रामनवमीमुळे मंदिरात गर्दीही जास्त होती. स्थानिकांनी तत्परता दाखवत काही जणांना बाहेर काढले ही दिलासादायक बाब आहे.

दहा जणांना बाहेर काढण्यात आले आहे. पोलीस कमिश्नर मकरंद देउस्कर यांच्यासह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. एसडीआरएफची टीमही अडकलेल्या लोकांची सुटका करत आहे. सर्व भाविकांना मंदिराबाहेर काढण्यात आले आहे. रुग्णवाहिकाही पोहोचली आहे. विहिरीत पडलेल्यांना दोरीच्या साह्याने बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशRam Navamiराम नवमी