शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 17:29 IST

हायकोर्टात सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून न्यायाधिशांसमोर हजर झाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे...

साधारणपणे कोरोना काळापासून संपूर्ण जगभरात 'वर्क फ्रॉम होम' कल्चर वाढले आहे. महत्वाचे म्हणजे, न्यायालयांतही ऑनलाइन सुनावणी होऊ लागली आहे. मात्र अनेक वेळा कॅमेऱ्यात काही असे दृष्य कैद होतात, ज्याचा कधी कुणी विचारही केलेला नसतो. आता गुजरात हाईकोर्टातूनही असाच एक प्रकार समोर आला आहे.  हायकोर्टात सुनावणी सुरू असताना एक व्यक्ती टॉयलेट सीटवर बसून न्यायाधिशांसमोर हजर झाला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, ही घटना २० जूनची आहे. न्यायमूर्ती नीरज एस देसाई यांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू होती. यावेळी 'समद बॅटरी' नावाच्या व्यक्तीने लॉग इन केले होते. त्याच्या गळ्यात ब्लूटूथ इअरफोन दिसत आहेत. तो आपला मोबाईल काही अंतरावर ठेऊन त्याकडे बघताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फ्लशवरून संबंधित व्यक्ती टॉयलेट सीटवर बसलेली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नाही तर, या व्हिडिओमध्ये तो स्वतःला स्वच्छ करतानाही दिसत आहे. यानंतर तो वॉशरूममधून बाहेर पडतो. 

न्यायालयाच्या नोंदीनुसार, संबंधित व्यक्ती एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेत प्रतिवादी म्हणून हजर होता. तो फौजदारी खटल्यात तक्रारदार होता. दोन्ही पक्षांमध्ये तडजोड झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित एफआयआर रद्द केला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयGujaratगुजरात