शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: १५ वर्षीय मुलीच्या मागे साप लागला; एका महिन्यात ६ वेळा चावला; गावात दहशत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 13:39 IST

या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे.

UP News:उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण गाव दहशतीत आहे. सिरथू तहसील परिसरातील भैनसहापर गावातील १५ वर्षीय रिया मौर्य हिला एका महिन्यात सहा वेळा साप चावला आहे. रियाचे वडील राजेंद्र मौर्य यांचा दावा आहे की, २२ जुलै २०२५ रोजी शेतात जात असताना, सापाने रियाला पहिल्यांदाच चावले. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर ती बरी झाली, परंतु नंतर वारंवार ही घटना घडली.

चार दिवसांत ४ वेळा चावलारियाच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, १३ ऑगस्ट रोजी सापाने तिला पुन्हा चावले. प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी तिला प्रयागराजला रेफर केले. रिया कशीबशी पुन्हा एकदा मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आली. मात्र, २७ ऑगस्ट ते ३० ऑगस्टच्या सकाळपर्यंत सापाने रियाला चारवेळा दंश केला. कधी तिला आंघोळ करताना तर कधी घरकाम करताना साप चावला. 

पीडित रिया म्हणते की, तिला चावलेला साप खूप मोठा आणि गडद काळ्या रंगाचा. चावल्यानंतर सुमारे १ तासानंतर ती बेशुद्ध पडते. जेव्हा तिला शुद्ध येते, तेव्हा ती कधी हॉस्पिटलच्या बेडवर असते तर कधी भूतविरोध करणाऱ्या तांत्रिकाजवळ असते. सततच्या घटनांमुळे घाबरून, रियाची लहान भावंडे आता त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी गेली आहेत. संपूर्ण कुटुंब झोपडीसारख्या कच्च्या घरात राहते आणि आता तेथून स्थलांतर करण्याचा विचार करत आहे.

तीन वेळा रुग्णालयात आणलेसिरथू सामुदायिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अखिलेश सिंह यांनीही सर्पदंशाच्या या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की रिया मौर्यला तीन वेळा रुग्णालयात आणण्यात आले. प्रत्येक वेळी तिच्या पायावर सर्पदंशाच्या खुणा आढळल्या. मुलीला वारंवार साप चावला हे आश्चर्यकारक आहे. 

गावातील लोकही आता घाबरले आहेत. गावकऱ्यांचा आरोप आहे की, माहिती असूनही वन विभागाने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला नाही किंवा प्रशासनाने कुटुंबाला मदत केली नाही. हे प्रकरण आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे.  

टॅग्स :snakeसापUttar Pradeshउत्तर प्रदेश