शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकऱ्यांमध्येही विदर्भ मागेच नागपूर कराराचे पालन झालेच नाही : मधुकर किंमतकर यांनी वेधले लक्ष

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. यातून नोकऱ्याही सुटलेल्या नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१० ते २०१३ या चार वर्षांची आकडेवारी पाहिली तर एकट्या पुणे विभागात ५०.४९ टक्के तर विदर्भात ९.६८ टक्के उमेदवारांची निवड झाल्याची धक्कादायक माहिती आहे. तेव्हा विदर्भावरील हा अन्याय कधी थांबेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नागपूर : विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. नागपूर कराराचे पालन कधी झालेच नाही; त्यामुळे सिंचनापासून तर कृषिपंपापर्यंत आणि रस्त्यांपासून तर विजेच्या कनेक्शनपर्यंत सर्वच क्षेत्रात विदर्भावर अन्याय करण्यात आला. यातून नोकऱ्याही सुटलेल्या नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०१० ते २०१३ या चार वर्षांची आकडेवारी पाहिली तर एकट्या पुणे विभागात ५०.४९ टक्के तर विदर्भात ९.६८ टक्के उमेदवारांची निवड झाल्याची धक्कादायक माहिती आहे. तेव्हा विदर्भावरील हा अन्याय कधी थांबेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
माजी राज्यमंत्री आणि विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य ॲड. मधुकर किंमतकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेद्वारे याकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, नागपूर करारांतर्गत विदर्भातील तरुणांंना नोकरीच्या संधी या लोकसंख्येच्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन नव्हे तर वचन देण्यात आले होते. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार एकूण महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ही ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३ इतकी आहे. त्यामध्ये कोकण विभागाची लोकसंख्या (मुंबई मिळून) २ कोटी ८६ लाख १४४१ म्हणजेच २३.४५ टक्के इतकी आहे. नाशिक विभागाची लोकसंख्या १ कोटी ५७ लाख ९,४२० (१६.५३ टक्के), पुणे विभाग २ कोटी ३४ लाख ४९ हजार ४० (२०.८७ टक्के), औरंगाबाद विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३१ हजार ८७२ (१६.६७ टक्के), अमरावती विभागाची लोकसंख्या १ कोटी १२ लाख ५८ हजार ११७ (१०.०२ टक्के) आणि नागपूर विभागाची लोकसंख्या १ कोटी १७ लाख ५४ हजार ४३४ (१०.४६ टक्के) इतकी आहे. त्यामानाने शासकीय नोकऱ्यांमधील संधीच्या प्रमाणात प्रचंड तफावत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे जवळपास १०८ प्रकारच्या ग्रेडनिहाय नोकऱ्यांसाठी उमेदवारांची निवड करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी २०१० ते २०१३ या चार वर्षांत लोकसेवा आयोगामार्फत जी निवड करण्यात आली त्यातील भयावह तफावतीबाबत राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१० ते २०१३ या चार वर्षांच्या काळात लोकसेवा आयोगाकडून ती निवड करण्यात आली.