आम्ही देशाचं संरक्षण करतो, तुम्ही लोकांची हत्या, कॅप्टन अमरिंदर यांचा पाक लष्करप्रमुखांवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 04:30 PM2018-11-26T16:30:54+5:302018-11-26T16:36:33+5:30

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केली आहे.

vice president venkaiah naidu lay foundation stone for karatarpur corridor punjab cm attacks on pak army chief | आम्ही देशाचं संरक्षण करतो, तुम्ही लोकांची हत्या, कॅप्टन अमरिंदर यांचा पाक लष्करप्रमुखांवर निशाणा 

आम्ही देशाचं संरक्षण करतो, तुम्ही लोकांची हत्या, कॅप्टन अमरिंदर यांचा पाक लष्करप्रमुखांवर निशाणा 

Next
ठळक मुद्देउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केलीया कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर निशाणा साधला आहे.पाकिस्तानचे सेना प्रमुख बाजवा मला खूप ज्युनिअर आहेत. मी मुशर्रफ यांनाही सीनिअर आहे.

अमृतसर- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी डेरा बाबा नानक- करतारपूर साहिब कॉरिडोरची पायाभरणी केली आहे. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. या कार्यक्रमात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांवर निशाणा साधला आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, मी कमर बाजवा यांना सांगू इच्छितो की, मीसुद्धा एक जवान आहे हे त्यांनी विसरू नये. पाकिस्तानचे सेना प्रमुख बाजवा मला खूप ज्युनिअर आहेत. मी मुशर्रफ यांनाही सीनिअर आहे. प्रत्येक जवानाला माहीत असतं की, दुसरा जवान काय विचार करतो. आम्ही नेहमीच देशाचं संरक्षण करू इच्छितो. परंतु तुम्हाला हे कोणी शिकवलं की लोकांची हत्या करा, अमृतसरचे लोक कीर्तन करत आहेत. तर तिकडे ग्रेनेडनं हल्ले करत आहेत, असं म्हणत पाकच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.


कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी करतारपूर साहिब कॉरिडोरसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानले.
शिखांची जुनी मागणी आज पूर्ण झाली आहे. करतारपूर साहिब कॉरिडोरवर आम्ही गुरु नानक देव यांच्या नावे मोठा द्वार बनवू इच्छितो. आम्ही याचं नाव करतारपूर द्वार ठेवणार आहोत.


(आठवं आश्चर्य... मोदी सरकारच्या निर्णयाचं चक्क पाकिस्तानकडून कौतुक!)

कसं असणार करतारपूर साहिब कॉरिडोर?
करतारपूर साहिब कॉरिडोरअंतर्गत दिल्ली-करतारपूर रस्ता तयार करण्यात येणार आहे. हे काम पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात करण्यात येणार आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे भारतीय नागरिकांना पाकिस्तानातून वाहत येणाऱ्या रावी नदीच्या किनारी असलेल्या गुरुद्वारा करतारपूर साहिब जाण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे भारतीय तीर्थ यात्री त्या पवित्र ठिकाणी जाऊ शकतील. करतारपूर साहिब शिखांचे प्रथम गुरु गुरुनानक देव यांचं निवासस्थान आहे. गुरुनानक यांनी स्वतःच्या आयुष्यातील 17 वर्षं 5 महिने 9 दिवस इथे घालवले होते. त्यानंतर त्यांचं कुटुंबीय तिथे वास्तव्याला आलं. त्यांच्या आई-वडिलांचं निधनही तिथेच झालं आहे. त्यामुळेच शिखांसाठी हे श्रद्धास्थान आहे. केंद्र सरकार गुरुदासपूर जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत करतारपूर कॉरिडोरचं निर्माण करणार आहे. जिथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कॉरिडोरच्या माध्यमातून लोकांना करतारपूर साहिब जाण्यास मदत होणार आहे. भारतानं पाकिस्तान सरकारलाही त्याच्या क्षेत्रातील भागात सुविधा पुरवण्याचं आवाहन केलं आहे.

पाकिस्तानही करणार कॉरिडोरचं निर्माण
पाकिस्ताननंही या महिन्यात कॉरिडोर बनवण्याचं काम सुरू करणार आहे. इम्रान खान स्वतः याचं भूमिपूजन करणार आहे. कॉरिडोर 2019पर्यंत पूर्ण होणार आहे. पाकिस्तान सरकारनं भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

Web Title: vice president venkaiah naidu lay foundation stone for karatarpur corridor punjab cm attacks on pak army chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.