शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

"देशाच्या काही भागात निवडणुकांची गरज नाही...", असं का म्हणाले उपराष्ट्रपती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 12:46 IST

Vice-President Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 

Vice-President Jagdeep Dhankhar : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, मात्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशातील काही भागात निवडणुका आणि लोकशाही निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या काही भागांत लोकसंख्येचा समतोल इतका ढासळला आहे की, तिथं निवडणुकांना आणि लोकशाहीला काही अर्थ उरलेला नाही. तिथं निकाल काय लागणार, हे आधीच माहीत असतं, असं म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चिंता व्यक्त केली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जयपूर येथे चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परिषदेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. 

लोकसंख्येच्या बदलामुळं देशातील अनेक भाग राजकीय बालेकिल्ले बनले आहेत. तिथे निवडणुका आणि लोकशाहीला काही अर्थ नाही, कारण निकाल आधीच ठरलेले असतात. जगात लोकसंख्या बदल हे एक आव्हान बनत आहे. हे अत्यंत चिंताजनक आव्हान पद्धतशीरपणे हाताळले नाही तर ते अस्तित्वाचे आव्हान बनेल, असं जगात घडलं आहे. या लोकसंख्येच्या विकारामुळं, लोकसंख्येच्या भूकंपामुळं ज्या देशांनी आपली १०० टक्के ओळख गमावली आहे, त्या देशांची नावं घेण्याची गरज नाही, असं म्हणत लोकसंख्येचा असा असमतोल अणुबॉम्बपेक्षा कमी घातक नाही, असंही उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले.

याचबरोबर, आपली संस्कृती पाहा, आपली सर्वसमावेशकता आणि विविधतेतील एकता हे सकारात्मक समाजव्यवस्थेचे पैलू आहेत. खूप सुखदायक आहेत. आम्ही सर्वांचं मनमोकळेपणानं स्वागत करतो, पण त्याचा परिणाम काय होत आहे? याचा गैरफायदा चुकीच्या पद्धतीनं घेतला जात आहे. लोकसंख्येची अव्यवस्था, जातीवर आधारित दुर्भावनापूर्ण विभागणी आणि अशा प्रकारच्या इतर अनेक गोष्टींना धक्का बसत आहे आणि गंभीरपणे तडजोड केली जात आहे, असं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं.

संकटाला तोंड देण्यासाठी...कोणत्याही विशिष्ट राज्याचा किंवा प्रदेशाचा उल्लेख न करता उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, जेव्हा काही भागात निवडणुका येतात, तेव्हा लोकसंख्येची अराजकता लोकशाहीतील राजकीय असुरक्षिततेचा बालेकिल्ला बनत चालला आहे. देशात झालेला हा बदल आपण पाहिला आहे. लोकसंख्येतील बदल इतका मोठा आहे की, हा परिसर राजकीय गड बनतो. लोकशाहीला अर्थ उरला नाही, निवडणुकीला काही अर्थ उरला नाही.  कोण निवडून येणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. असे भाग आपल्या देशात आहेत आणि ते झपाट्याने वाढत आहेत. अशा संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला जात, पात, रंग, संस्कृती, श्रद्धा या भेदांच्या पलीकडं जावं लागेल. सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. 

टॅग्स :IndiaभारतPoliticsराजकारण