संकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड २२ डिसेंबरला
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
संकेश्वर : संकेश्वरचे नगराध्यक्ष गजानन क्वळ व उपनगराध्यक्षा महादेवी मुडशिनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी २२ डिसेंबरला होणार आहेत.पालिकेत २३ पैकी २२ नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र, भाजपमधील गृहकलहामुळे १३ नगरसेवकांमध्ये असंतोष आहे. कोल्डवॉरमुळे पदासाठी प्रत्येकी १३ महिन्यांचा समझोता झाल्याने अध्यक्ष क्वळी व उपाध्यक्ष ...
संकेश्वर पालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड २२ डिसेंबरला
संकेश्वर : संकेश्वरचे नगराध्यक्ष गजानन क्वळ व उपनगराध्यक्षा महादेवी मुडशिनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी २२ डिसेंबरला होणार आहेत.पालिकेत २३ पैकी २२ नगरसेवक भाजपचे आहेत. मात्र, भाजपमधील गृहकलहामुळे १३ नगरसेवकांमध्ये असंतोष आहे. कोल्डवॉरमुळे पदासाठी प्रत्येकी १३ महिन्यांचा समझोता झाल्याने अध्यक्ष क्वळी व उपाध्यक्ष मुडशिंनी आपल्या पदाचे राजीनामे १२ नोव्हेंबरला दिले होते, ते २९ नोव्हेंबरला मंजूर झाले आहेत.यावेळी सामान्य वर्गासाठी आरक्षण असल्याने अध्यक्षपदासाठी संजय शिरकोळी व उपाध्यक्षा सविता सावंत यांची नावे चर्चेत आहेत. २२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एस. एस. बल्लारी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेऊन दुपारी १ वाजता निकाल घोषित करण्यात येणार आहे.नगरसेवक राजू बांबरे हेही अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे निवडणूक होणार की, कोणत्या पद्धतीने मनोमिलन होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)