शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती बिघडली, दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 18:12 IST

LK Advani : लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अपोलो रुग्णालयानं एक निवेदन जारी केलं आहे.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागात लालकृष्ण अडवाणी यांना दाखल करण्यात आले. न्यूरो सर्जन डॉ. विनीत सुरी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची तब्येत स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अपोलो रुग्णालयानं एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलं की, लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९६ वर्ष आहे. ते वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे अस्वस्थ आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

लालकृष्ण अडवाणी यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करण्यात आला. लालकृष्ण अडवाणी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले.

लालकृष्ण अडवाणी हे भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. लालकृष्ण अडवाणी हे गेल्या १० वर्षांपासून सतेत असलेल्या भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. लालकृष्ण अडवाणी हे दृढनिश्चयी आणि सक्षम नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 

टॅग्स :Lal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीhospitalहॉस्पिटलBJPभाजपा