शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2017 14:22 IST

दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची किडनी काम करत नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. 

ठळक मुद्देप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई, दि. 4 - प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची किडनी काम करत नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिलीपकुमार यांचे वय आता 95 वर्ष असून, या वयात त्यांच्या शरीरावर नवीन औषधांचा प्रयोग करणे शक्य नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. त्यांचे ह्दय चांगल्या स्थितीत आहे पण प्रॉसट्रेटचा विकार बळावत चालला आहे. 

 बुधवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. वार्धक्यामुळे आलेल्या आजारपणांमुळे त्यांची प्रकृती वारंवार बिघडत असते. याआधी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ताप आणि पायाला आलेली सूज या तक्रारीमुळे लीलावती मध्ये ऍडमिट करण्यात आले होते.

दिलीप कुमार यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ साली पेशावर (पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे वडील व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येऊ लागले होते. १९३०च्या दरम्यान लाला गुलाम सरवर हे आपल्या पत्नीसह सात मुलांना घेऊन मुंबईत स्थायिक झाले. बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार हे बालपणापासून मित्र होते. या दोघांचेही कुटुंब पेशावर येथे राहणारे होते. या दोघांच्याही कुटुंबांमध्येही जवळचे संबंध होते. राज कपूर यांचे वडिल पृथ्वीराज कपूर हे सर्वात आधी मुंबईला आले होते. त्यानंतर दिलीप कुमार यांचे वडील लाला गुलाम सरवर हे आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईला आले.

ट्रॅजेडी किंग ही उपाधी लागलेल्या दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनय कारकीर्दीला ज्वार भाटा (१९४४) पासून सुरुवात केली. अंदाज (१९४९), दीदार (१९५१), आन (१९५२), देवदास (१९५५), मुगल-ए-आझम (१९६०), गंगा जमना (१९६१), मधुमती (१९५८), राम और श्याम (१९६७), आदमी (१९६८), गोपी (१९७०), बैराग (१९७६), शक्ती (१९८२) यासारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट. अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी आठ वेळा पटकावला आहे. केंद्र सरकारने १९९४ साली त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अतुलनीय कारकीर्दीबद्दल दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केले. १९९८ मध्ये पाकिस्तान सरकारने त्यांना निशान-ए-पाकिस्तान हा पुरस्कार बहाल केला.

अभिनेता दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाते. रुपेरी पडद्यावर दु:खी व्यक्तिरेखा साकारणा-या दिलीप यांच्या खासगी आयुष्यातील ट्रॅजेडी फार कमी जणांना माहित आहेत. दिलीप कुमार जेव्हा चित्रपटसृष्टीतही आले नव्हते तेव्हा त्यांना लोक युसुफ खान या नावानेच ओळखत होते.