शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:27 IST

इस्रोची ही १०१वी मोहीम होती. नियोजित वेळेनुसार रविवारी सकाळी ११:५९ वाजता पीएसएलव्हीने उड्डाण केले. परंतु...

श्रीहरिकोटा : पृथ्वी निरीक्षण उपग्रहाच्या (ईओएस-०९) प्रक्षेपणाची भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्रो) मोहीम रविवारी अपयशी ठरली. ध्रुवीय प्रक्षेपण यान - पीएसएलव्ही सी-६१च्या साहाय्याने हे प्रक्षेपण करण्यात आले. मात्र, तिसऱ्या टप्प्यात या रॉकेटमध्ये दाबाची समस्या उद्भवल्याने ही मोहीम पूर्ण होऊ शकली नाही. 

इस्रोची ही १०१वी मोहीम होती. नियोजित वेळेनुसार रविवारी सकाळी ११:५९ वाजता पीएसएलव्हीने उड्डाण केले. परंतु, ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही.  इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात मोटारच्या कप्प्यात आवश्यक दबाव कमी झाल्याने ही मोहीम अपयशी ठरली. लवकरच या दोषाचे विश्लेषण करून नव्याने मोहीम आखली जाईल. 

पृथक्करण प्रणालीतील दोषाचा परिणामयानाच्या प्रक्षेपणानंतर पृथक्करणाचे (विभक्त होण्याची प्रक्रिया) चार टप्पे असतात. पहिला टप्पा १११.६४ सेकंदात अपेक्षित होता, तो ११० सेकंदातच पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यात इग्निशन १११.८४ सेकंदात अपेक्षित होते. ते ११०.२ सेकंदात पूर्ण झाले. तिसरा टप्पा महत्त्वाचा होता. यात पृथक्करण २६४.३४ सेकंदांना अपेक्षित होते. मात्र, ते २६१.८ सेकंदातच झाले आणि अपेक्षित प्रक्षेपण होऊ शकले नाही.अयशस्वी प्रक्षेपणानंतर रॉकेटचे काय झाले? 

पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणानंतर सुमारे ४५० किलोमीटर उंचीवर तिसऱ्या टप्प्यात ही समस्या उद्भवली. त्यामुळे हे रॉकेट समुद्रात कोसळले असेल.\

ईओएस-०९ आहे काय?२०२२ मध्ये ईओएस-०४ उपग्रह पीएसएलव्हीच्या साहाय्याने प्रक्षेपित करण्यात आला होता. तसाच हा एक कृत्रिम उपग्रह आहे. कोणत्याही वातावरणात पृथ्वीच्या पृष्ठभागाची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे घेण्याची याची क्षमता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, कृषी, वन देखरेख, सुरक्षेसाठी महत्त्व आहे. 

टॅग्स :isroइस्रोIndiaभारत