शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गुणांचे सत्यापन करणार : सॉफ्टवेअरच्या मदतीने गुणांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) प्रथमच बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरने करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच ही पडताळणी करण्यात येणार आहे जेणेकरुन निकालाबाबत सवाल उपस्थित व्हायला नको. मागील वर्षीच्या चुकीपासून धडा घेत बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) प्रथमच बोर्डाच्या परीक्षेच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरने करणार आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच ही पडताळणी करण्यात येणार आहे जेणेकरुन निकालाबाबत सवाल उपस्थित व्हायला नको. मागील वर्षीच्या चुकीपासून धडा घेत बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षी परिक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली होती. जेव्हा विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेची रि-चेकिंग केली तेव्हा अनेक विद्यार्थ्यांचे ५ ते २६ गुण वाढले होते. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी परिक्षेचे निकाल तयार करण्यासाठी आउट लायर सॉफ्टवेअरची अखेरची चाचणी केली आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री (शालेय शिक्षण) उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, बोर्डाच्या आयटी विभागाने निकाल जाहीर होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या गुणांचे सत्यापन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था केली आहे. बोर्डाच्या निकाला त्रुटी राहू नयेत म्हणून तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. बोर्डाचा असा दावा आहे की, यामुळे २०१८ च्या परीक्षा निकालात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही.बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा निकालातील चूक पहिल्या टप्प्यात पकडण्यासाठी यंदा आउट लायर सॉफ्टवेअर तयार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला पाचपैकी दोन किंवा एका विषयात कमी गुण मिळाले म्हणजे, तीन विषयात या विद्यार्थ्याला ८० ते ९० टक्के गुण आहेत. तर, दोन विषयात ४० ते ५० गुण आहेत. अशावेही सॉफ्टवेअर तत्काळ अशा निकालाला लाल रंगात दाखवेल. विद्यार्थ्याला ज्या विषयात कमी गुण मिळाले आहेत त्या विषयांचे सत्यापन झाल्यानंतरच आउट लेअर निकालाला ग्रिन सिग्नल देईल.बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी २६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देत आहेत. या पार्श्वभूमीवर दीड कोटींपेक्षा अधिक उत्तरपत्रिका तपासण्यात येतील. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर नोडल सेंटरवर मार्क्स स्लिप ऐवजी विद्यार्थ्यांचे गुण थेट सॉफ्टवेअरवर जातील आणि सॉफ्टवेअर कोणतीही चुकीची माहिती लाल रंगात दाखवून देईल. यामुळे प्राथमिक स्तरावरच निकालाचे सत्यापन होईल.

टॅग्स :examपरीक्षाeducationशैक्षणिक