शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

दिग्विजयसिंह, ज्योतिरादित्य यांच्यात शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 11:01 IST

मध्य प्रदेशचे राजकारण तापले; देशाला कलंक असल्याचे आरोप

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह व काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे. त्या राज्यात उज्जैन येथे महाकालेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्याचे दर्शन घेतल्यानंतर दिग्विजयसिंह म्हणाले की, हे महाकाल, ज्योतिरादित्य शिंदेंसारखे दुसरे कोणी काँग्रेसमध्ये पुन्हा जन्माला येऊ नये. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी सांगितले की,  ‘देशद्रोही’ तसेच मध्य प्रदेशचे मोठे नुकसान करणारे दिग्विजयसिंह यांच्यासारखे लोक भारतात जन्माला येणार नाही याची भगवान महाकालेश्वराने काळजी घ्यावी.दिग्विजयसिंह यांनी शुक्रवारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्याला शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च २०२०मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला व ते केंद्रीय मंत्री झाले. 

दिग्विजयसिंह व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील शाब्दिक चकमकीबाबत भाजप नेते व मध्य प्रदेशचे मंत्री महेंद्रसिंह सिसोदिया म्हणाले की, मध्य प्रदेश व काँग्रेसचे मोठे नुकसान करणाऱ्या दिग्विजयसिंह यांना पुढचा जन्म पाकिस्तानात व्हायला हवा. दिग्विजयसिंह हे पाकिस्तान समर्थक असल्याचा व ते देशाला कलंक असल्याची टीका वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री विश्वास सारंग यांनी केली. 

अशी झाली होती उलथापालथ  मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर २०१८ मध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले.   त्यानंतर काही काळाने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी बंडखोरी करून काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपमध्ये प्रवेश केला.   त्यामुळे अल्पमतात गेलेले कमलनाथ सरकार कोसळले.   त्यानंतर मध्य प्रदेशात भाजपचे सरकार सत्तेवर येऊन शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले होते.   या राज्यात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंह