शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील वाद मिटविण्यासाठी वेणुगोपाल यांची शिष्टाई; सरकार टिकविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:30 IST

कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली.

बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा त्यात काही बदल होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, आघाडीतील दोन्ही पक्षांतील कुरबुरीही वाढल्या आहेत.वेणुगोपाल मंगळवारी रात्री बंगळुरूमध्ये दाखल झाले. कुमारस्वामी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांची त्यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यानंतर, कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये काँग्रेस आमदारांनी कुमारस्वामी यांच्या कारभाराबद्दल वेणुगोपाल यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजते. राज्यातील काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांची रविवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन कुमारस्वामींबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कुमारस्वामी मंत्रिमंडळात सध्या जनता दलाच्या वाट्याच्या दोन व काँग्रेसची एक अशा तीन जागा रिकाम्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात त्या भरून काढण्याचे गाजर दोन्ही पक्षांतील आमदारांना त्यांच्या नेत्यांनी दाखविले होते, पण अद्याप तसा निर्णय होत नसल्याने काँग्रेसच्या आमदारांत असंतोष पसरला आहे. कुमारस्वामींच्या ३४ जणांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काँग्रेसचे २२ व जनता दलाचे १२ मंत्री आहेत. कुमारस्वामींचे सरकार केव्हाही कोसळू शकते, अशी चर्चा सुरू आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटक