शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

...आणि काँग्रेसमधील 'या' नेत्याच्या आठवणीने उपराष्ट्रपती गहिवरले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:14 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज राज्यसभेमध्ये भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली - संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये आज माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एस. जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रेड्डी यांच्या स्मृतींना उजाळा देताना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे भावूक झाले. जयपाल रेड्डी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी 28 जुलै रोजी निधन झाले होते. सोमवारी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून सदस्यांनी दोन मिनिटे मौन पाळले. त्यावेळी जुने मित्र असलेल्या रेड्डी यांना श्रद्धांजली वाहताना उपराष्ट्रपतींना गहिवरून आले. ''रेड्डी यांचे जाणे माझ्यासाठी खूप वेदनादायी आहे.  त्यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये मंत्री म्हणीन काम पाहिले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक ज्येष्ठ खासदार, एक प्रभावी वक्ता आणि एक कुशल प्रशासक गमावला आहे.'' असे नायडूंनी सांगितले. यावेळी व्यंकय्या नायडू यांनी जयपाल रेड्डी यांच्याशी असलेल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांचाही उल्लेख केला. ''रेड्डी माझे मित्र, ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक होते. आंध्र प्रदेश विधानसभेचे आमदार असताना आम्ही दोघेही एकाच बेंचवर बसत असू. त्यावेळी विधानसभेचे कामकाज सकाळी 8 वाजता सुरू होत असे. तेव्हा मी आणि रेड्डी सकाळी सात वाजता ब्रेकफास्टसाठी भेट असू. त्यावेळी विविध मुद्द्यांवर आमची चर्चा होत असे. रेड्डींचे प्रत्येक विषयाबाबतचे ज्ञान, आकलन क्षमता, इंग्रजी आणि तेलुगू भाषेवरील पकड आणि उर्दु भाषेबाबतची माहिती उत्तम होती. त्यांचे जाणे दु:खदायी आहे.'' असे सांगताना व्यंकय्या नायडूंना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूRajya Sabhaराज्यसभा