शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापम घोटाळ्यातील आरोपी प्रवीण यादवची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 18:36 IST

मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्यातील एका आरोपीने न्यायायलात हजर होण्याआधीच आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण यादव असे या आरोपीचे नाव असून त्याला आज व्यापम घोटाळ्याप्रकरणी जबलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार होते. 

मुरैना, दि. 26 - मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्यातील एका आरोपीने न्यायायलात हजर होण्याआधीच आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण यादव असे या आरोपीचे नाव असून त्याला आज व्यापम घोटाळ्याप्रकरणी जबलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार होते. पोलिस अधिकारी आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले की, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या महाराजपूर गावात राहणा-या प्रवीण यादव याने बुधवारी सकाळी राहत्या घरात पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली. व्यापम घोटाळ्यातील हा आरोपी असून त्याला आज न्यायायलात हजर व्हावे लागणार होते. दरम्यान, त्याने न्यायालयात हजर रहावे लागणार असल्याच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली असून तपास सुरु आहे. व्यापम घोटाळ्याप्रकरणी प्रवीण यादव याला 2012 मध्ये आरोपी बनविले होते. त्याची एसआयटीमार्फंत चौकशी करण्यात आली होती. त्याला आज जबलपूर येथील उच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार होते.  

काय आहे मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळा?मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठय़ा गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये आजवर 24 आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित 50 जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठय़ा असामींसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे.पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे, सरकारी नोकरीमध्ये नियुक्त्या करणे अशा गैरप्रकारांना 2009 पासून सुरुवात झाली. 3012 पर्यंत जवळपास 1020 विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र या सर्वांच्या अर्जाची छाननी केली असता एकाचाही अर्ज आढळून आला नाही, तर याच काळात 1087 अपात्र उमेदवारांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. तसेच कंत्राटी शिक्षक, अन्ननिरीक्षक, पोलीस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आले. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांबाबत तक्रारी वाढल्यानंतर हा घोटाळा असल्याचे उघड झाले. इंदोरमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आनंद राय यांनी हा घोटाळा उजेडात आणला.