शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

सुवर्ण मंदिरालाही हवा व्हॅटिकनसारखा दर्जा, कट्टर शिखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:38 IST

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये झालेल्या लष्करी कारवाईबद्दल जागतिक व्यासपीठावर पंतप्रधानांनी माफी मागणे व्हॅटिकनच्या धर्तीवर

नवी दिल्ली : अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये झालेल्या लष्करी कारवाईबद्दल जागतिक व्यासपीठावर पंतप्रधानांनी माफी मागणे व्हॅटिकनच्या धर्तीवर अकाल तख्त आणि हरमिंदर साहिबला विशेष दर्जा बहाल करण्यासह ३ मुख्य मागण्या इतर देशांत असलेल्या मूलतत्ववादी शीख गटांनी केल्या आहेत. या गटांची सरकारशी गुप्त बोलणी सुरू आहे.या घडामोडींशी संबंध असलेल्या २ जणांपैकी एकाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये लंडनला भेट देण्याच्या आधी लंडनस्थित संवादक व शिख मानवी हक्क सभेचे संचालक जसदेव सिंग राय यांच्यामार्फत इंग्लडमधील शीख गटांशी प्रारंभी संपर्क निर्माण करण्यात आला आणि राय आणि इतर ३० शिख नेत्यांनी मोदी यांची त्यांच्या त्या दौºयात भेट घेतली. औपचारिक बोलणी सुरू झाली. बोलणी करण्यास भारत सरकार आधीही उत्सुक होते, परंतु मोदी सरकार आल्यानंतर त्याने वेग घेतला, असे दुसºया नेत्याने सांगितले.संपर्कानंतर शीख गटांनी २ प्राथमिक पावले टाकली आणि ३ मुख्य मुद्दे चर्चेसाठी मांडले, असे एकाने सांगितले.परदेशात असलेल्या ज्या मूलतत्ववादी शीख कार्यकर्त्यांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे ती उठवावी आणि २० राजकीय कार्यकर्त्यांची सुटका करावी, अशी दोन पावले सुरुवातीला टाकावीत, अशी मागणी आहे. राय यांनी जे दोन महत्त्वाचे मुद्दे भारताकडे उपस्थित केले आहेत, त्यात भारताच्या पंंतप्रधानांनी आॅपरेशन ब्लूस्टारसाठी जगभरातील शिखांची माफी मागावी, हा एक आहे.सुवर्ण मंदिरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी जून १९८४ मध्ये करण्यात आलेल्या लष्करी कारवाईत ५०० पेक्षा जास्त जण ठार झाले होते.अकाली तख्तचे श्रेष्ठत्व मान्य करा-इतर मागण्यांत अकाल तख्त आणि हरमिंदर साहिबचे श्रेष्ठत्व सरकारने मान्य करायचे आहे. व्हॅटिकनला जो विशेष दर्जा आहे, तसाच दर्जा अकाल तख्त आणि हरमिंदरसाहिबला हवा आहे. आॅपरेशन ब्लूस्टारमुळे झालेल्या शीखविरोधी दंगली आणि न्यायव्यवस्थेबाहेरील हत्यांसह इतर प्रश्नांवर सरकार खुली चर्चा करण्यास तयार असेल, असे या दोघांनी सांगितले. मात्र, विदेशांतील शिखांच्या काही संघटना खलिस्तानचे उघड समर्थन करणाºया आहेत. त्यांच्यापैकी काही जणही याच प्रकारची पुन्हा-पुन्हा मागणी करीत असतात.