शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

‘मोदीगेट’मध्ये वसुंधरा राजेही

By admin | Updated: June 18, 2015 01:55 IST

विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे याही मोदीगेटमध्ये अडकल्या आहेत. घोटाळेबाज ललित मोदींनी सुषमा स्वराज

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीविदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे याही मोदीगेटमध्ये अडकल्या आहेत. घोटाळेबाज ललित मोदींनी सुषमा स्वराज आणि राजे यांच्याशी असलेल्या घनिष्ठ संबंधाची जाहीर कबुली दिल्याने वादात भर पडली आहे. आणखी काही बडी नावे प्रकाशात येण्याची शक्यता वर्तवली जात असून, भ्रष्टाचारमुक्त भारत या नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला सुरुंग लागला असताना सरकारने सारवासारव चालविली आहे. ललित मोदी यांचा पासपोर्ट पुन्हा एकदा जप्त करण्याचे आणि मनीलाँड्रिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल करीत कठोर कारवाई करण्याचे संकेत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिले आहेत.ललित मोदी यांच्या गौप्यस्फोटानंतर वादाचा झोत स्वत:कडे वळल्याने अडचणीत आलेल्या वसुंधरा राजे यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. सुषमा स्वराज अमेरिका भेटीवर जात आहेत तर अर्थमंत्री अरुण जेटली १० दिवसांच्या अमेरिका भेटीवर यापूर्वीच रवाना झाले आहेत. स्वराज यांनी बुधवारी एकमेव टिष्ट्वट करीत मुलीचा बचाव केला. माझी मुलगी आॅक्सफर्डची पदवीधर असून बॅरिस्टर आहे. तुम्ही जे म्हणत आहात ते पूर्णपणे खोटे आहे, असे त्या टिष्ट्वटमध्ये म्हणाल्या. दरम्यान, वसुंधरा राजे यांनी विधानसभेचे अधिवेशन २४ जून रोजी सुरू होताच आरोपांना प्रत्युत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले.ललित मोदींना आव्हान संपुआ सरकारच्या काळात ब्रिटनच्या चॅन्सलरला पाठविलेली सर्व पत्रे जारी करा, माझी सर्व आरोपांना उत्तरे देण्याची तयारी आहे, असे चिदंबरम म्हणाले. मोदींनी ब्रिटनमध्ये चालविलेले वास्तव्य नियमांचे उल्लंघन करणारे असून रालोआ सरकारने त्यांच्यावर मेहेरनजर ठेवल्याचे सर्वज्ञात आहे, असे चिदंबरम म्हणाले. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मोदींचा पासपोर्ट परत करण्याचा आदेश दिल्यानंतर त्याविरुद्ध अपील न करण्याचा निर्णय कुणी घेतला? सर्वसाधारणपणे अशा निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाते, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.आयपीएल घोटाळा उघडकीस आल्यानंतर काँग्रेसचे नेते शशी थरुर यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. चिदंबरम यांनी दोन वर्षांपूर्वी ललित मोदी यांनी लंडनमध्ये आश्रय घेतल्याचा आणि त्यांच्यावर मनीलाँड्रिंगचा आरोप असल्याची माहिती देत ब्रिटिश सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. चिदंबरम यांनी २०१३ मध्ये ब्रिटनचे अर्थमंत्री जॉर्ज ओस्बोर्नी यांच्यासोबत चर्चेत ललित मोदींना हद्दपार करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.राजे यांची कौटुंबिक साथ ललित मोदी दोन वर्षांपूर्वी पत्नीला पोतुर्गालमध्ये कॅन्सरवरील इलाजासाठी नेण्यात आले तेव्हा वसुंधरा राजे सोबत होत्या, असा दावा केला आहे. डिसेंबर २०१३ मध्ये वसुंधरा राजे दुसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्री बनल्या. आॅगस्ट २०११ मध्ये ललित मोदी यांच्या स्थलांतरण प्रकरणात ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या साक्षीदाराच्या निवेदनावर (विटनेस स्टेटमेंट) राजे यांची स्वाक्षरी आहे. ------------------फेमा उल्लंघन आणि मनीलाँड्रिंगचे गंभीर आरोप असताना ललित मोदींना भारतातून पलायन करीत ब्रिटनमध्ये वास्तव्य करण्याची सोय उपलब्ध करवून देण्याचा पाया याच अर्जातून रचला गेला. ललित मोदी यांच्या कंपूंनी राजे यांच्या समर्थनाचे व्हिसा दस्तऐवज जारी केले, मात्र त्याबद्दल राजे यांनी अनभिज्ञता दर्शविली. ———————३० वर्षांपासूनची मैत्रीवसुंधरा राजे यांच्याशी आमचे ३० वर्षांपूर्वीपासून कौटुंबिक संबंध आहेत. त्या माझ्या पत्नीच्या निकटस्थ मैत्रीण राहिल्या आहेत. साक्षीदार बनण्याची बाब त्या जाहीरपणे कबूल करीत मात्र मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना ते शक्य झाले नाही. त्यांनी दिलेली निवेदने न्यायालयात दाखल आहेत, असेही ललित मोदींनी म्हटले. माझ्या पत्नीला पोर्तुगालमध्ये नेण्यात आले तेव्हा त्या २०१२ आणि १३ साली मिनालमध्ये तिच्यासोबत होत्या, अशी माहितीही मोदींनी दिली. ———————-स्वराज आणि मोदींच्या प्रतिमा जाळल्यायुवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोलकाता येथे बुधवारी सुषमा स्वराज आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या प्रतिमा जाळून निदर्शने केली. भवानीपोर भागातील जादूबजार भागात मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते गोळा झाले होते.