शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बदलते हवामान, रोगातही तग धरणारे गव्हाचे वाण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:50 IST

भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

- टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन संस्थेने गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे. भारताच्या अन्नधान्य आणि पोषण सुरक्षिततेसाठी वरदान ठरणाऱ्या ‘एचडी ३२२६’ (पुसा यशस्वी) या गव्हाच्या वाणाचा शोध लावला आहे. कोल्हापूरच्या डॉ. किरण बापूसाहेब गायकवाड यांनी. डॉ. गायकवाड भारतीय कृषी संशोधन संस्थेत (आयएआरआय) शास्त्रज्ञ आहेत.कर्बोदके (कार्बोहायड्रेट) खाल्ल्यानंतर तात्काळ शर्करा तयार होते. मधुमेहग्रस्तांच्या पोळी खाण्यावर त्यामुळे बंधने. ‘एचडी ३२२६’ हा गहू मात्र मधुमेहग्रस्तांसाठी वरदान ठरण्याची शक्यता. जास्त प्रथिने असल्याने हा गहू ग्लिसमिक रिस्पॉन्स इंडेक्समध्ये तळाच्या क्रमवारीत असेल. या गव्हाची चपाती खाल्ल्यानंतर कार्बोहायड्रेटचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यास बराच अवधी लागेल, त्यावर संशोधन सुरू आहे.‘पुसा’ कॅम्पसमध्ये गव्हाचे वाण विकसित करताना वातावरणात होणारे बदल, पिकावरील रोगांचा अभ्यास केला जातो. संकर करून नवे वाण विकसित केले जाते. ग्रेकल व एचडी २८९४ चे संकर करून सर्वोत्तम एचडी ३२२६ वाण विकसित करण्यात आले आहे.पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व जम्मू-काश्मीर गटात सर्वाधिक गहू पिकतो. या गटात नव्या वाणाची चाचणी. भारतात एकूण ३२ मिलियन हेक्टरमध्ये ९८ मिलियन टन उत्पादन. एकूण ७ ते ८ मिलियन हेक्टरमध्ये आयएआरआय विकसित एचडी २९६७ व एचडी ३०८६ हेच वाण वापरले जाते.एचडी २९६७ या वाणावर पिवळा तांबेरा येत असल्यामुळे अधिक उत्पादन देणारे एचडी ३२२६ वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.>एचडी ३२२६ ची वैशिष्ट्येअति उष्ण, अति शीत हवामान, अवकाळी पावसात हे वाण तग धरू शकेल. संपूर्ण पीक उद्ध्वस्त करणाºया यलो रस्ट (तांबेरा), कर्नाल बंट व पावडरी मिल्ड्यू - या रोगांशी लढण्याची क्षमता. सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टर ५८ क्विंटल. हवामान, हाताळणी, औषध फवारणी - जुळून आल्यास प्रतिहेक्टर ७९.८ क्विंटल उत्पादन. या वाणात सर्वाधिक सरासरी १३ व जास्तीत जास्त १४ टक्के प्रथिने. उत्पादन जास्त झाले तरी प्रथिने कमी होणार नाहीत. ‘अ‍ॅग्री फूड कॅनडा’ संस्थेतील संशोधक डॉ. सिजो जोसेफ आणि डॉ. गायकवाड यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हे वाण ‘लो ग्लिसमिक इंडेक्स’मध्ये समाविष्ट होऊ शकेल; पण त्यासाठी अजून संशोधनाची गरज.